नांदेड , दि.१ ; ( राजेश भांगे ) –
देगलूर शहरात दि. २९ फेब्रुवारी रोजी व्हाटस् अॕप ग्रूप वरून अक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी देगलूर पोलिसांनी संतोष कोनगुलवार, आसद जागीरदार,नामदेव निलंमवार,नागेश पाशमवार या चार तरूणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असे देगलूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक धबडगे यांनी बोलताना दिली.
सदरील प्रकरणा विषयी देगलूर पोलिस ठाणे पोलिस निरिक्षक धबडगे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले समाजात तेढ निर्माण होईल अशी एक अक्षेपार्ह पोस्ट देगलूर शहरातील व्हाटस् ॲप ग्रूप वर फिरत होती. व या अक्षेपार्ह पोस्ट मुळे समाजातील शांतता व कायदा सुव्यवस्था बादित होवु शकते हे लक्षात येताच पोलिस निरीक्षकांनी वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले. व अक्षेपार्ह पोस्ट टाकणाय्रा व त्यावर भाष्य करणाऱ्या त्या चोघांना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले . व सोशल मिडियाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवर पोलिस दलातील सायबर विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे व अशी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास व चुकिची अफवा पसरविल्यास त्यांच्या विरूद्ध तत्काळ कारवाई करण्यात येईल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. व पुढिल चौकशीसाठी या तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याचे समजताच शहरात एकच खळबळ उडाली. तरी विविध व्हाट् स ॲप ग्रूप अॕडमिननी झालेल्या प्रकाराने ( उरात धडकि भरून ) आपआपल्या मोबाईल मधील व्हाट् स ॲप सेटिंग तत्काळ बदल्याचे दिसुन आले.