Home मराठवाडा जिल्ह्यात मी आणि एसपी हे दोनच गुंड  – जिल्हाधिकारी डाॕ. वि. इटनकर

जिल्ह्यात मी आणि एसपी हे दोनच गुंड  – जिल्हाधिकारी डाॕ. वि. इटनकर

178
0

नांदेड , दि.२९ :- ( राजेश भांगे ) –
नांदेड चे नवे जिल्हाधिकारी डाॕ. विपीन इटनकर यांनी जाहिर कार्यक्रमात बोलताना जिल्ह्यात मी आणि एसपी हे दोनच गुंड असल्याचे वक्तव्य केले. यानंतर सद्या नांदेड व जिल्ह्यात याचीच चर्चा सुरू आहे. डाॕं. विपीन इटनकर यांनी नुकतेच नांदेड च्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारले आहे. शुक्रवारी दिनांक २८ फेब्रुवारी रोजी रात्री मावळते जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या निरोप समारंभा चा कार्यक्रम पार पडला असता याच कार्यक्रमात नुतन जिल्हाधिकारी डाॕ. विपीन इटनकर बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी विपीन इटनकर म्हणाले जिल्ह्यात केवळ दोनच गुंड असतात एक म्हणजे जिल्हाधिकारी आणि दुसरा म्हणजे पोलिस अधिक्षक ( एसपी ) या दोन गुंडांनी गुंडागर्दि केली नाहि तर दुसरे गुंड तयार होतात. त्यामुळे अशा प्रकारे मी आणि पोलिस अधिक्षक आम्ही दोघे गाडिच्या दोन चाकां प्रमाणे हा जिल्हा चालवु.

Unlimited Reseller Hosting