Home मराठवाडा गुन्हे शाखेच्या कार्यवाहीत 7 जुगाऱ्यांना अटक , “30 हजार चा मुद्देमाल जप्त”

गुन्हे शाखेच्या कार्यवाहीत 7 जुगाऱ्यांना अटक , “30 हजार चा मुद्देमाल जप्त”

55
0

अब्दुल कय्युम

औरंंगाबाद : किलेअर्स परिसरातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करीत ७ जुगारयांना अटक केली. जुगारयांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगारासाठी लागणारे साहित्य व रोख रक्कम असा एकुण ३० हजार रूपये कींमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निसार हकीम कुरैशी, सय्यद युसूफ सय्यद युनूस, सय्यद अजीज पाशा सय्यद इब्राहीम, अनिल बाबुराव शिंदे, सय्यद नासीर सय्यद मुजीब, शेख हबीब शेख रहेमान, सय्यद अय्याज सय्यद सिराज अशी अटक केलेल्या जुगारयांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे, विजय पवार, सहाय्यक फौजदार विठ्ठल जवखेडे, जमादार सय्यद मुजीब अली, तुकाराम राठोड, किरण गावंडे, भावसिंग चव्हाण, राहुल खरात, विजय पिंपळे, सुनील बेलकर, देशमुख, चिंचोळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्या जुगारयांविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार गवळी करीत आहेत.