Home सातारा दुष्काळी भागातील महत्वाकांक्षी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे  विध्यार्थ्यांना  मोठे कुतूहल

दुष्काळी भागातील महत्वाकांक्षी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे  विध्यार्थ्यांना  मोठे कुतूहल

305

खटाव माण अँग्रो येथे अभ्यास सहलीमार्फत गावोगावचे विद्यार्थी घेऊ लागले औध्योगिकीकरणाचे धडे

मायणी :- ता. खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)

खटाव माण तालुका अँग्रो. पडळ कारखान्यास सातारा जिल्ह्यातील विविध गावाच्या शाळा अभ्यास सहलींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भेटी देत आहेत . या अभ्यास सहलीत औद्यागिकीकरणाचे धडे घेताना दुष्काळी भागातील महत्वाकांक्षी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विध्यार्थ्यांना मोठे कुतूहल व आनंद व्यक्त होताना दिसून येत आहे .

सध्याच्या शिक्षण प्रणाली मध्ये परिसर अभ्यास , भूगोल या विषयातून विध्यार्थी – विद्यार्थिनी उद्योग, दळणवळण, नद्या, संपर्क साधने, हवामान, नकाशा आदी घटकांची माहिती मिळवत असतात. पण पुस्तकात दिलेली उद्योग व कारखान्यांची माहिती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देऊन पूर्वज्ञानाची सांगड घालण्यासाठी आजवर भारतमाता ज्युनिअर कॉलेज, कला वाणिज्य महाविद्यालय मायणी ,जि. प. शाळा व रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालय ,एनकुळ,जि.प. शाळा पडळ, दातेवाडी, कणसेवाडी,कलेढोण,गारळेवाडी,कानकात्रे, च्या विद्यार्थ्यांनी तसेच रिद्धी-सिद्धी महिला बचत गट धोंडेवाडी यांनी खटाव माण तालुका अँग्रो साखर कारखान्याची क्षेत्रभेटीसाठी निवड केली.

याठिकाणी विद्यार्थ्यांनी औद्योगिकीकरणाचे धडे घेत ,आपल्या रोजच्या आहारात विविध पदार्थांमध्ये आवश्यक असणारी साखर प्रत्येक्ष कोणत्या कोणत्या प्रक्रियेतून तयार होते. गव्हाणी ते साखर गोदाम असा साखर निर्मितीचा प्रत्येक्ष अनुभव व या निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री कोणती याची माहिती कारखान्याचे इंजिनिअर अभिजित बाबर,प्रशासन विभागाचे दत्ता कोळी ,मल्हारी नाकाडे ,सेफ्टी विभागाचे रुपेश कणसे यांचेकडून दिली जाते .

चालू २०१९-२० चा प्रथम गळीत हंगाम चालू असून कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे यांच्या दूरदृष्टीतून तसेच को चेअरमन मनोज घोरपडे यांच्या साथीने निर्माण झालेल्या या कारखान्यात असणारी मोठी यंत्र सामग्री ,भली मोठी धूर सोडणारी चिमणी,मोठमोठ्या रसाच्या,पाण्याच्या टाक्या,वीज निर्माण कक्ष हे सर्व पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असतो . मुलांनी येथे काम करणाऱ्या काही कामगार बंधूंशी सुद्धा संवाद साधतात . निर्माण झालेली ताजी साखर खाऊन विद्यार्थी आनंदी होतात.

चौकट :- दुष्काळी भागात निर्माण झालेला खटाव माण अँग्रो हा प्रकल्प साखर निर्मितीबरोबरच वीजनिर्मिती तसेच इतर उपपदार्थ निर्मिती करतो . कमीतकमी कर्मचाऱ्यांवर चालणाऱ्या या कारखान्यात असणारी संपूर्ण मिशनरी तसेच साखर निर्मिती ची संपूर्ण प्रक्रिया पाहण्याची संधी दिल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे व को-चेअरमन मनोज घोरपडे यांचे धन्यवाद . -एस एस देशमुख ,शिक्षक ,भारतमाता ज्युनिअर कॉलेज मायणी