Home बुलडाणा देउळगावराजा येथे गुटखा साठा जप्त…!

देउळगावराजा येथे गुटखा साठा जप्त…!

72
0

उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कार्यवाही..!!

अमीन शाह

बुलडाणा , दि. २९ :- देऊळगावराजा शहरातील चिखली रोड वरील मांडोत ज्वेलर्स शेजारी असलेल्या एका मंडप बिछायत केंद्र याठिकाणी डीवायएसपी पथकाने छापा टाकून २५ हजार ७४० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
आज डीवायएसपी भीमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर घुगे, पोहेकाँ. मोहन गीते, अनुप मेहर, विलास इंगळे यांनी दुपारी २ वाजे दरम्यान शफी मंडप बिछायत केंद्र येथे छापा टाकुन केशरयुक्त गोवा प्रीमियम १००० या कंपनीच्या गुटख्याच्या चार कट्टे यामध्ये १९८ गुटखा पुडे जप्त करून सदरचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला आणून जमा केला दोघा कडून हा माल जप्त केल्याची माहिती मोहन गीते यांनी दिली तर अन्न औषध प्रशासन विभाग यांना याबाबत लेखी पत्र देऊन पंचा समक्ष पंचनामा करून सदर माल जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईमुळे शहर परिसरामध्ये गुटखा विक्री माफीयांमध्ये खळबळ उडाली आहे.