Home मराठवाडा अंगावर ऑटो टाकून लूटमार करणारा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

अंगावर ऑटो टाकून लूटमार करणारा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

61
0

अब्दुल कय्युम

औरंंगाबाद , दि. २९ :- रस्त्याने पायी जात असलेल्या गिरीश व्यंकटेश गोळेगावकर (वय ४५, रा.विद्यानगर, गारखेडा परिसर) यांच्या अंगावर रिक्षा घालून १६ हजार रूपये कींमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा करणारया रिक्षाचालकास पोलिसांनी अवघ्या ६ तासात गजाआड केले. लहु उर्प झगल्या रमेश चव्हाण (वय २५, रा.मुकुंदनगर, मुकुनदवाडी) असे अंगावर रिक्षा घालून लुटमारी करणारया रिक्षाचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश गोळेगावकर हे काही कामानिमित्ताने परभणी येथे गेले होते. गुरूवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास गोळेगावकर हे परभणी येथून परत आल्यावर रिक्षाने सेव्हनहिल चौकात आले. तेथून ते घराकडे पायी जात असतांना लहु उर्प झगल्या चव्हाण याने त्यांना कोठे जायचे आहे असे विचारले. त्यावेळी गोळेगावकर यांनी विद्यानगरात जायचे असल्याचे सांगून रिक्षात बसण्यास नकार देत ते पुढे चालू लागले. त्यावेळी लहु उर्प झगल्या चव्हाण याने त्यांच्या अंगावर रिक्षा क्रमांक (एमएच-२०-ईके-०३८०) घातल्याने गोळेगावकर बचावासाठी पळाले. या गडबडीत त्यांच्या खिशातील मोबाईल खाली पडल्यावर रिक्षा चालकाने सदरचा मोबाईल उचलून पोबारा केला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासाच्या आत लहु उर्प झगल्या चव्हाण याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी गोळेगावकर यांचा मोबाईलही जप्त केला.