Home मराठवाडा अडीच वर्षा नंतर खून प्रकरणातील आरोपीस अटक

अडीच वर्षा नंतर खून प्रकरणातील आरोपीस अटक

48
0

अब्दुल कय्युम

औरंंगाबाद , दि. २९ :- प्लॉटींगच्या व्यवसायातून प्लंबरकाम करणारया शेख जब्बार शेख सत्तार (रा.बिस्मील्ला कॉलनी) याची निर्घृणपणे हत्या करून फरार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखा पोलिसांनी अडीच वर्षानंतर गजाआड केले. शेख सिकँदर शेख बशीर (वय ३०, रा. टाऊनहॉल, जयभीमनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्लॉटींगच्या वादातून प्लंबरकाम करणारया शेख जब्बार यांची हत्या कुख्यात शेख वाजेद उर्प बबला व त्याच्या साथीदारांनी मे-२०१८ मध्ये निर्घृणपणे केली होती. त्यानंतर शेख सिवंâदर हा गुजरातला पळून गेला होता. तर शेख वाजेद उर्प बबला व इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. नुकतीच न्यायालयाने शेख वाजेद उर्प बबला व त्याच्या साथीदारांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेख वाजेद उर्प बबलाचा साथीदार शेख सिकंदर हा मिसारवाडीत राहणारया पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंखे, प्रकाश चव्हाण, प्रभाकर राऊत, संजय जाधव, नितीन देशमुख आदींच्या पथकाने मिसारवाडीत सापळा रचून शेख सिकंदर शेख बशीर याला अटक केली.