Home विदर्भ एकाच दिशेने जाणाऱ्या दोन वाहनाच्या धडकेत कार चे मोठे नुकसान.!

एकाच दिशेने जाणाऱ्या दोन वाहनाच्या धडकेत कार चे मोठे नुकसान.!

18
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – नागपुर कडून सेलुकडे येणाऱ्या कारला मागून लोखंड घेवून येणाऱ्या ट्रक ने सेलु नजिकच्या पोहाणे यांच्या विटभट्टी जवळ धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सदर घटना २७ फेब्रुवारी चे संध्याकाळी ५.२० चे दरम्यान घडली.
कुळकर्णी कुटुंबातील प्रचित कुळकर्णी, आई जयश्री कुळकर्णी व बहिण प्रियंका सर्व राहणार धरमपेठ, नागपूर हे वैगन आर कार क्र.MH31 FA 3524 ने नागपुर येथून वर्धा येथे एका नातेवाईकांकडे असलेल्या लग्नाचे स्वागत समारोहात जाण्यासाठी निघाले होते. सेलु बायपास ओलांडून काही पुढे येताच मागून येणारा ट्रक क्र.WB17-N 1429 जो ओरिसा येथून जालना येथे लोखंड घेवून जाणाऱ्या ने कारला धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत सर्व बचावले.

Unlimited Reseller Hosting