महत्वाची बातमी

अल्पवयीन मुलावर दोघांचा बलात्कार , “परिसरात उडाली खळबळ”

Advertisements

अमीन शाह

चंद्रपूर , दि. २९ :- राजुरा शहरातील किसान वार्ड येथे ११ वर्षीय अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन दोन इसमाविरुध्द राजुरा पोलिसांनी ३७७, ५०६ तसेच १०,(३),(६),(७) ‘पास्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची वेळीच दखल घेत आरोपी पिन्टु रागीट (३२), शंकर तामखाने (४५) याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीने आपले आई सोबत येवून दिलेल्या रिपोर्टनुसार आरोपी पिन्टु रागीट व शंकर तामखाने यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केल्याचे सांगितले. पिंटु रागीट यांनी याकामी आपल्या मोटारसायकलचा वापर केल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. ह्या घटनेमुळे फिर्यादीची मानसिक स्थिती बिघडली असुन तो दडपणाखाली आहे. सदर घटनेबाबत राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव व पोलिस निरिक्षक नरेंद्र कोसुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदवुन आरोपीना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास ऐ. एस. आय. मधुकर ढोके करीत आहेत.

You may also like

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...