Home आंतरराष्ट्रीय हज यात्रेला जाणारे आंतरराष्ट्रीय विमान बंद होण्याच्या मार्गावर

हज यात्रेला जाणारे आंतरराष्ट्रीय विमान बंद होण्याच्या मार्गावर

200

प्रवासी भाडे वाढल्याचा परिणाम, यात्रेकरूंनी केली मुंबईहुन बुकींग

अब्दुल कय्युम

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू असलेले एकमेव आंतरराष्ट्रीय विमानही आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी हज यात्रेकरूंसाठी शहरातून जेद्दाहला हे विमान जाते.

मात्र, यंदा या विमान प्रवासाचे भाडे प्रती प्रवासी तब्बल ३७ हजार रुपये अतिरिक्त आकारले जात आहे. त्यामुळे यात्रेकरूंनी हज यात्रेच्या या विमानाचे केंद्र रद्द करून ते मुंबईहून सुरू करावे, अशी मागणी केली आहे. अनेकजण जणांनी मुंबईहून जाण्यासाठी तिकीट बुकिंगही केली आहे.
औरंगाबाद हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून दरवर्षी हज यात्रेसाठी विशेष विमान चालविण्यात येते. दहा ते पंधरा दिवसांसाठी ही सेवा सुरू असते. या सेवेचा लाभ मराठवाडा आणि नगर येथून अंदाजे साडेतीन हजार हज यात्रेकरू घेतात. मात्र, २०१८पासून हज यात्रेच्या या विमान प्रवास आरंभ केंद्राहून जाणारया प्रवाशांकडून जास्त शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे औरंगाबादहून थेट जेद्दाहला जाणारया हज प्रवाशांची संख्या घटत चालली आहे. २०१८मध्ये या यात्रेकरूंकडून प्रती प्रवासी २२ हजार ७०० रुपये अतिरिक्त घेण्यात आले. २०१९मध्ये १३ हजार रुपये अतिरिक्त घेण्यात आले. यंदा प्रत्येक प्रवाशामागे ३७ हजार ३५२ रुपये अतिरिक्त घेण्यात येत आहेत. त्यामुळे यंदा ऑक्टोबरमध्ये हज यात्रेसाठी जाणारया भाविकांची संख्या चक्क निम्म्याच्याही खाली म्हणजे फक्त १२००पर्यंत पोहोचली आहे. एकमेव सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमान उड्डानाला घरघर लागल्यामुळे औरंगाबाद येथील हज यात्रा विमान प्रवास आरंभ केंद्र रद्द करून ते मुंबईला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तिकीट वाढ ???

दरवर्षी हज यात्रेसाठीची निविदा प्रक्रिया हज समिती करते. मात्र, यंदा एअर इंडियाने निविदा भरली नाही. यामुळे हज यात्रेकरूंना फ्लाय नाज या सौदी एअर कंपनीच्या विमानातून जेद्दाहकडे रवाना व्हावे लागणार आहे. एअर इंडिया किंवा देशांतर्गत विमान कंपन्यांना हज यात्रेसाठी जाणा-या यात्रेकरूंना सोयी – सुविधा उपलब्ध करणे सोपे जाते. मुळातच औरंगाबाद विमानतळावर मोठ्या विमानासाठी सुविधा कमी आहे. त्यात विमानतळाच्या शुल्कासह अन्य सुविधांचा खर्च वाढल्याने विमानाचे तिकीटही वाढविण्यात आल्याची माहिती हज समितीच्या सुत्रांनी दिली आहे.