Home जळगाव समाजसेवक सुमित पाटील यांची शिवजयंती निमित्त संकल्प पूर्ती

समाजसेवक सुमित पाटील यांची शिवजयंती निमित्त संकल्प पूर्ती

53
0

मराठा समाजातील विवाह संबंध जोडण्याचा केला होता संकल्प….

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील वावडदा तालुका येथील रहिवासी असलेले गौरी उद्योग समूहाचे चेअरमन सुमित पाटील हे मराठा समाज सेवक म्हणून ओळखले जातात.स्वतःचा प्रपंच सांभाळत ,कुणबी व मराठा समाजातील विवाह संबंध निशुल्क जुळावे,विवाह योग्य तरुण तरुणींच्या आईवडिलांचा विवाह जुळवण्यासाठीचा त्रास कमी व्हावा व पायपीट थांबावी यासाठी सुमित पाटील व त्यांची मित्रमंडळी सतत अविरत कार्य करीत असतात.या कार्याचाच भाग म्हणून १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त किमान एक तरी विवाह जुळवून आणू असा सुमित पाटील यांनी संकल्प केला होता व असे म्हणतात निस्वार्थ भावनेने व मनापासून केलेले काम नेहमी सिद्धीस जाते त्याप्रमाणे शिवजयंती ला एक नाही,दोन नाही तर तब्बल आठ विवाह संबंध सुमित पाटील व त्यांचे सहकारी मराठा सेवकांनी जुळून आणले.
सुमित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षात केवळ सामाजिक भावनेतून आपल्या समाजाची सेवा व्हावी या उद्देशाने तब्बल ४५०० संबंध निशुल्क जुळले आहेत.खान्देशातील मराठा समाज नोकरी कार्यनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेर देखील स्थायिक झाला आहे यातच विवाह जुळवणे म्हणजे मोठे जिकरीचे झाले आहे व यात मोठा खर्च हि होत असतो.मराठा समाजातील नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी सुमित पाटील व त्यांचे सहकारी कोणत्याही प्रकारची फी न घेता,खर्च न घेता निशुल्क विवाह संबंध जुळवण्याचे कार्य करीत आहेत.लोकांचे आशीर्वाद व प्रेम असेच राहिल्यास भविष्यात देखील समाजासाठी हे कार्य अविरत सुरु ठेवण्याचे सुमित पाटील यांनी सांगितले.