Home सातारा श्री सद्गुरु यशवंतबाबा महाराज यांच्या चांदीच्या नवीन मुखवटाची पालखीतून भव्य मिरवणूक

श्री सद्गुरु यशवंतबाबा महाराज यांच्या चांदीच्या नवीन मुखवटाची पालखीतून भव्य मिरवणूक

208
0

यशवंत नाम घेता| हरे संसाराची चिंता ||
म्हणऊनीया शरणांगत|आम्ही विठोबाचे दूत||
दैन्य दुःख सोडविले|निजवर्म दाखविले||
दास म्हणे यशवंत| जगामाजी कीर्तिवंत||

मायणी – सतीश डोंगरे

मायणी व मायणी परिसरातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांच्या भाविक भक्तांनी महाराजांच्या पालखी मध्ये ठेवण्यासाठी श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराजांचा चांदीचा मुखवटा बनवून दिला आहे त्याची पालखीतून भव्य मिरवणूक गुरुवार दिनांक ५.३.२०२० रोजी सायंकाळी चार वाजता ब्राह्मण विठोबा मंदिरापासून ते श्री सद्गुरु यशवंत बाबा समाधी स्थळापर्यंत श्री पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी तालुका तासगाव जिल्हा सांगली तसेच संत सावतामाळी तरुण भजनी मंडळ माळीनगर(मायणी) व मायणी परिसरातील सर्व भजनी मंडळाच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी असे आव्हान श्री सद्गुरु यशवंत बाबा भजनी मंडळ मायणी यांनी केले आहे.