Home विदर्भ कोरपणा सीडीसीसी बैंकच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचा चेक वठवुण रक्कम केली गायब

कोरपणा सीडीसीसी बैंकच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचा चेक वठवुण रक्कम केली गायब

120

संबंधीत बैंक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी !

मनोज गोरे

चंद्रपुर / कोरपना , दि. २६ :- तालुक्यातील चोपण या गावातील शेतकरी शासनाकडून मिळालेल्या पीक कर्जावर आपल्या शेती मांडवा सोसायटीमधून 43000 रुपये कर्ज मिळाले.पीक कर्ज घेऊन ते व्यवसाय करत होते मात्र त्यांना जून महिन्यामध्ये 2019 मध्ये पीक कर्ज मिळालं तर त्या पीककर्जाचे चेक सदर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मध्ये टाकण्याकरता आले असता त्यांना तुमचा चेक मी जमा करतो असे सांगून त्या शेतकऱ्यांकडून बैंक कर्मचाऱ्यांनी चेक घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांनी चेक वटळून घेतला मात्र त्या शेतकऱ्यांना जमा केल्याचे सांगून घरी परत पाठविले काही दिवसानंतर शेतकऱ्यांनी चेक जमा झाल्याची चौकशी केली असता खात्यात पैसे जमा झाले नाहीत याची माहिती मिळाली त्यानंतर सदर कर्मचारी यांना सांगितले असता चेक जमा होतील असेच शेतकऱ्यांना सांगून टाळाटाळ चालवलेली आहेत मात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज त्यांच्या हातात न मिळाल्यामुळे त्यांना शेतीमध्ये नुकसान सहन करावे लागले आणि त्यांच्या सातबार्यावर कर्ज चढले त्यामुळे सदर दोषी असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी व मला 2 लाख देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी बैंक संचालकांना केली आहे, मला न्याय मिळवून देण्यात यावा अशी आर्त हाक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहेत तेव्हा सदर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा व चेक घेऊन कर्ज चेक घेऊन जमा करतो म्हणणाऱ्या व स्वतः वटविणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे .