Home विदर्भ गडचांदूर नगर परिषदेत पद ग्रहण सोहळा संपन्न…

गडचांदूर नगर परिषदेत पद ग्रहण सोहळा संपन्न…

100

मनोज गोरे

गडचांदूर न. प. सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल लागून बराच काळ लोटला.
जनतेने काँग्रेसच्या सौ.सविताताई टेकाम यांना प्रचंड बहुमताने विजयी झाल्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला परंतु उपाध्यक्ष पदासाठी सर्व पक्षात फुटाफुटीचे डावपेच काही दिवस आखले गेले. पण अखेर मित्र पक्षाच्या उमेदवार ला उपाध्यक्ष पदाचा दावेदार म्हणून शरद भाऊ जोगी (रा. काँ.) यांची १० पैकी ६ मतांनी निवड काही दिवांपूर्वीच झाली.

मात्र प्रत्यक्ष कामाचा भार सांभाळण्यासाठी पद ग्रहण सोहळा ठेवण्यात आला.या सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका आणि स्वीकृत नगरसेवक तथा काँग्रेसचे पापय्याजी पोन्नमवार, राष्ट्रवादीचे कांग्रेसचे अरुण भाऊ निमजे, पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. विशेष म्हणजे या पद ग्रहण सोहळ्यात राजुरा न. प. नगर अध्यक्ष अरुण भाऊ धोटे . शिवसेनेचे सरवरभाई उपस्थित होते. कांग्रेस पक्षाचे गटनेता विक्रम भाऊ येरणे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेता सौ. कल्पनाताई निमजे आणि सोबतच सर्व मान्यवरांचे, नगरसेवकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कोरपना तालुका काँग्रेस अध्यक्ष थिपे सर तर आभार प्रदर्शन प्रशासकीय अधिकारी पिदुरकर यांनी केले.या सोहळ्यात सर्व कर्मचारी वर्ग आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला होता आत्ता मोठा विकासाचा गाजावाजा करून निवडणूक जिंकली जनतेचे प्रश्न, गावाचा विकास करण्यासाठी निवडणुकीत दिलेलं आस्वासने कितपत यशस्वीे रित्या पार पाळतील याकडे संपूर्ण गडचांदुर वासियांचे लक्ष लागलेंआहे.