Home महत्वाची बातमी आता सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतूनच होणार

आता सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतूनच होणार

44
0

विधानसभेत विधेयक मंजूर

अमीन शाह

सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. त्यांनंतर आज मंगळवार (२५ फेब्रुवारी) रोजी विधानसभेत सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.
सरपंच परिषदेनेही ग्रामपंचायतीतून सरपंच निवडीला विरोध केला होता. एका शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही भेट घेतली होती. राज्यपालांच्या विरोधानंतर आज मंगळवारी अधिवेशनामध्ये मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून त्यामुळे जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद होणार आहे.