Home रायगड दिशा महिला मंच च्या आवाहनाला कामोठेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद…!!

दिशा महिला मंच च्या आवाहनाला कामोठेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद…!!

69
0

गिरीश भोपी

महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिशा महिला मंचच्या टीम ने शिवलिंगावर दूध अर्पण करणे टाळावे असे आवाहन कामोठेतील ॐ शिव शंकर सेवा मंडळ आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोठे शिवमंदिर तलाव येथे करण्यात आले.

त्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला , शिवलिंगावर दूध टाकल्याने बऱ्याच प्रमाणात ते वाया जाते व त्यानंतर अनेक दिवस त्या उग्र वासाचा त्रास जवळपास राहणाऱ्या लोकांना होतो हे टाळण्यासाठी जमा दूध गरम करून प्रसाद म्हणून भाविकांना देण्यात आले दूध पिशवी आदिवासी पाड्यात आणि लहान मुलांच्या वसतिगृहात देण्यात आली हजारो लिटर दूध वाया न जाता त्याचा योग्य तो वापर झाला आपण घेतलेल्या अथक परिश्रमाला यश मिळाल्याने दिशा ग्रुप मधील हिरकणींनाही वेगळाच आनंद हा उपक्रम देऊन गेला.
तेथे जमा झालेले निर्माल्य खतनिर्मिती करण्यासाठी केंद्रात पाठवण्यात आले या उपक्रमासाठी दिशा महिला मंच च्या संस्थापक निलम आंधळे .उषा डुकरे ,विद्या मोहिते, रेखा ठाकूर, ख़ुशी सावर्डेकर, दिपाली खरात ,विद्या वायकर , भावना सरदेसाई, रूपा कवीश्वर, अश्विनी नलावडे, प्रतिभा पवार,भाग्यलक्ष्मी,अर्चना,शिल्पा चौधरी, प्रमिला झिंजाड यांनी अथक परिश्रम घेतले .तसेच दोन्हीही मंडळाचे अध्यक्ष सखाराम जाधव आणि बाळाराम चिपळेकर तसेच मंडळाचे कार्यकर्ते रमेश म्हात्रे,किशोर गोवारी,संतोष म्हात्रे, जनार्दन गोवारी, विजय गोवारी, विश्वास पावणेकर यांचीही खूप मोलाची साथ मिळाली.
उपक्रमासाठी मिळालेल्या प्रतिसादासाठी कामोठेकरांचे मनापासून आभार