राज्यसभेचा कार्यकाळ संपत असल्याने त्याजागी शरद पवार, हुसेन दलवाई ,मजीद मेमन, राजकुमार धूत या महाविकास आघाडीच्या खासदारांचा समावेश होणार आहे तर रामदास आठवले, संजय काकडे, अमर साबळे या भाजप नेत्यांचाही समावेश आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे राज्यसभेत पुनर्वसन होणार असल्याने राज्यसभेच्या जागांसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच वाढली आहे. महाराष्ट्रातून सात जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे.म्हणून उदयनराजे यांनाच भाजपाने उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यात शंभुसेना संघटनेनेही महाराजांच्या बाजूने उडी घेतली आहे.
राज्यसभेसाठी उदयनमहाराज यांचे नाव आघाडीवर असल्यामुळे राज्यसभेतील राजकीय प्रतिस्पर्धी खासदार संजय काकडे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. म्हणून खा.संजय काकडे यांनी मात्र भाजपचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर टिका करत संजय काकडे म्हणाले की, उदयनराजेंचे भाजपसाठी काय योगदान आहे ? त्यांच्या पेक्षा मी पक्षाच्या वाढीसाठी जास्त प्रयत्न केले आहेत, राजेंच्या वंशजाबाबत ही प्रश्न करत,मी ही काकडे घराण्याचा वंशज आहे, म्हणत मलाच राज्यसभेत घ्यावे असे संजय काकडे बोलतांना म्हणाले. त्यामुळे आता काकडेंच्या या वक्तव्या बाबत भाजपमधून काय प्रतिक्रिया येतात, हेच पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तत्पूर्वी शंभुसेना संघटनेने सर्वप्रथम छत्रपती उदयनराजे यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली असून अवघ्या महाराष्ट्रातील शिव-शंभु भक्तांकडून ही काकडेंना टारगेट केले जाऊ शकते यात शंका नाही.