Home पश्चिम महाराष्ट्र निवृत्ती महाराज देशमुख यांना धमकी देणाऱ्यांच्याच तोंडाला काळे फासु – शंभुसेना प्रमुख...

निवृत्ती महाराज देशमुख यांना धमकी देणाऱ्यांच्याच तोंडाला काळे फासु – शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के

410

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

पुणे , दि. २० :- प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी नुकतेच किर्तनाच्या माध्यमातून एक जाहिर वक्तव्य केले होते. संबंधित वक्तव्य हे त्यांच्या मनच्या विचारांचे नसुन ते पौराणिक ग्रंथातले असल्याने इंदोरीकर महाराजांना कुणालाही दोष देता येणार याउलट शंभुसेना संघटना त्यांच्या पाठिशी कायम भक्कमपणे उभी राहील व धमकी देणाऱ्यांच्याच तोंडाला काळे फासु असा इशाराच शंभुसेना प्रमुख मा.दिपकराजे शिर्के यांनी दिला.

अहमदनगर जिल्ह्यातील इंदोरी येथील प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख हे किर्तनाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रासह देशभरात विविध सामाजिक विषयांवर विनोदबाजी रुपात समाज प्रबोधन करत असतात तसेच ग्रंथ-संदर्भानुसार ही परखड आणि स्पष्टपणे प्रबोधनपर विचार मांडत असतात अगदी त्याप्रमाणेच त्यांनी काही पुस्तकांचा संदर्भ देत नुकतेच समतिथीला मुलगा..आणि विषमतिथीला मुलगी..असे काही वक्तव्य केल्याचे कारण देत राईचा पर्वत करुन इंदोरीकर महाराजांना अडचणीत आणण्याचा काही विघ्नसंतोषी मंडळी प्रयत्न करत आहेत. परंतु या सर्व वादावर स्वतः इंदोरीकरांनी पुन्हा एकदा आपल्या किर्तनातुनच भाष्य केल आहे की, दोन तासांच्या किर्तनात एखादे शब्द अथवा वाक्य चुकीचे जावू शकते, शिवाय मी, जे बोललेलो ते मुद्दे अनेक ग्रंथात नमुद आहेत हे सर्व इंदोरीकरांनी थेट माध्यमांसमोर न बोलता आपल्या नंतरच्या झालेल्या कीर्तनातून सांगितले आहे.एवढेच नाही तर त्यांनी माफीपत्र ही जाहिर केले असताना तोंडाला काळे फासले जाईल अशी धमकी दिली गेल्याने शंभुसेना आक्रमक झाल्याचे दिसते.

म्हणूनच काही मोजक्या विघ्नसंतोषी मंडळींंचा विरोध पाहता प्रबोधकार देशमुख यांना आता अनेक संघटनेसह विविध मराठा संघटनांनी आपला पाठींबा दर्शिवला असतानाच शंभुसेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपकराजे शिर्के यांनीही देत, राजे शिर्के म्हणाले की, इंदोरीकर महाराजांना शंभुसेना संघटनेचा जाहिर पाठींबा असून त्यांनी बिंदासपणे कीर्तनातून समाज प्रबोधन करावे, आपल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात जर कोण आडवे येत असतील तर वेळप्रसंगी शंभुसेनेचे शंभुभक्त व शंभुसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशाराच शंभुसेना संघटनेने देशमुख महाराजांच्या विरोधकांना दिला आहे.