Home जळगाव रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

52
0

रावेर (शरीफ शेख)

रावेर येथील फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात ज्यांच्या विचारांवर जगणारा माणूस आयुष्यात कधीच कुणाची गुलामगिरी करु शकत नाही. असे, स्वराज्य निर्माते, बहुजन प्रतिपालक,कल्याणकारी राजे, कुळवाडीभुषण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेस उद्योजक श्रीराम पाटील,यांनी पुष्पहार अर्पण केले तर नगरसेवक जगदीश घेटे व कागमार नेते ‍दिलीप कांबळे यांनी ‍दिप व धुप पुजा केले. या वेळी उपस्थितानी अभिवादन केले.

यावेळी तालुका भुमीअभिलेख अधिकारी राजु घेटे,श्रीराम फाऊडेशनचे सचिव दिपक नगरे,भारिप ता.अध्यक्ष बाळु शितरतुरे,मा.नगरसेवक ॲड.योगेश गजरे, पंकजभाऊ वाघ,फुले,शाहु,आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, एल.डी. निकम साहेब,राजेरघुनाथ देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष अशोक शिंदे, प्रा. सी.एस.पाटील,पत्रकार संतोष कोसोदे,धनराज घेटे,महेश तायडे,अशोक घेटे, नितीन तायडे, लक्ष्मण पाटील,श्रीराम आटोचे संतोष महाजन, राहुल राणे,भुषण महाजन,सतोष गाढेसर, किशोर महाजन,संतोष पाटील, मुकेश महाजन, नंदु महाजन,मिलींद महाजन, लक्ष्मण पाटील,जितु महाजन, मुख्याध्यापक रविंद्र तायडे,विजय अवसरमल,बाळु तायडे,‍, अशोक घेटे,सुधीर सैगमिरे, अनिल घेटे,संजय तायडे, सदाशिव निकम, यांचेसह मोठया प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र ढिवरे यांनी तर आभार अमर पारधे, यानी मानले.

Unlimited Reseller Hosting