Home जळगाव मुस्लिम मंच च्या ४८ व्या दिवशी उपोषण सुरूच…!

मुस्लिम मंच च्या ४८ व्या दिवशी उपोषण सुरूच…!

181

पुलवामा घटनेतील शहिदांना श्रद्धांजली…!!

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे जळगाव जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा शुक्रवार हा अठ्ठेचाळीसावा दिवस होता या दिवशी इस्लामपुरा येथील महिलांनी भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शविला साखळी उपोषणाची सुरवात फारुक शेख यांच्या कुराण पठाणाने तर सांगता अश्रफुल नीसा अफजल यांच्या दुवा ने करण्यात आली.
*पुलवामा घटनेतिल शहिदांना श्रद्धांजली व मागणी*
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ च्या जवानांवर जो भ्याड हल्ला करून आमच्या सैनिकांचा जीव घेतला होता त्या आमच्या शहीद जवाना बाबत फारुक शेख यांनी सविस्तर माहिती विशद केली व आज त्या घटनेला पूर्ण एक वर्ष होत असल्याने त्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
श्रद्धांजली अर्पण झाल्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांनी या भ्याड हल्ल्याची अद्याप चौकशी अपूर्ण असून याचे आरोपी शोधून काढा व त्यांना फाशीवर चढवा अशी एकमुखी मागणी केली त्यास उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजून सहमती दर्शविली.
*उपोषणाची सुरवात* उपोषणा मध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने सर्वप्रथम अश्रफुल नीसा मुफ़्ती अफजल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सविस्तर अशी माहिती व मागणी सरकारकडे केली त्यात प्रामुख्याने पंतप्रधान मोदींनी आम्हास बहिणीचा दर्जा दिल्याने त्यांनी शाईन बाग मधील आपल्या बहिणी व संपूर्ण भारतात चालू असलेल्या आंदोलनाच्या द्वारे करीत असलेल्या बहिणींची मागणी मान्य करून सीएए हा कायदा रद्द करावा व एक एप्रिल पासून होणारी एम पी आर यालासुद्धा स्थगिती द्यावी अशी सुद्धा मागणी केली. रिजवाना अब्दुल अहद, जैबून्निसा सैय्यद , मैंमुना फारुख पटेल , बुशरा अनवर या महिलां सोबतच गफ्फार मलिक ,करीम सालार, फारुक शेख, अल्ताफ शेख,शाहिद सय्यद आदींनी सुद्धा शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून या कायद्याचा विरोध नोंदविला.
*यांची होती उपस्थिती*
गुलाम दस्तगीर, अन्वर शिकलकर, प्रोफेसर इक़बाल शाह, रईस शेख, ताहीर शेख, तय्यब शेख, खलील टेलर, यासह सचिन धांडे मुकुंद सपकाळे विनोद देशमुख आदींनी सुद्धा उपोषणस्थळी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.

*उपजिल्हाधिकारी भारदे यांना निवेदन*

उपोषणर्थिक सर्व सुमारे ७५ महिलांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांची भेट घेऊन आम्हास ४८ दिवस झाले शासनाचा कोणीही प्रतिनिधी आमची भेट घेत नाही अशी खंत व्यक्त करून त्यांना निवेदन सादर केले.