Home सोलापुर सोलापूर येथे सोशल उर्दू शाळेत “फ्रुट फेस्टिवलचा” कार्यक्रम

सोलापूर येथे सोशल उर्दू शाळेत “फ्रुट फेस्टिवलचा” कार्यक्रम

100
0

प्रतिनिधी – लियाकत शाह

सोलापूर , दि. १५ :- नुकताच सोशल उर्दू शाळेत सोलापूर मध्ये “फ्रुट फेस्टिवल” कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन इल्हाजुद्दीन फारुकी यांच्या हस्ते करण्यात आला होता. सोलापूर येथील नामांकित सोशल उर्दू शाळेत नवोपक्रम राबविणारे मुख्याध्यापक श्री आसिफ एकबाल व त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांनी शाळेत सर्व विद्यार्थ्यांसाठी फळांची माहिती, त्याची चव, त्यापासुन कोणते फायदे, ती फळे कोणत्या भागात घेतली जातात, फळाचे रंग, त्यांचे मराठी, उर्दू व ईग्रजी नावं कोणती इत्यादींची माहिती करून देण्यासाठी प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने विविध फळे आणुन त्याचे काप करून सर्व विद्यार्थ्यांना सर्वच फळे खायला देऊन माहितीही दिली. या “फ्रूट फेस्टिवल” कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष इल्हाजुद्दीन फारुकी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक अब्दुल गफुर अरब, मुजम्मील, यांच्या सह शाळेतील प्रत्येक वर्गाचे शिक्षक हजर होते.

Unlimited Reseller Hosting