Home जळगाव भुसावळ रनर्सच्या लेडीज रनच्या ट्रेनिंग सेशन्सला सुरुवात

भुसावळ रनर्सच्या लेडीज रनच्या ट्रेनिंग सेशन्सला सुरुवात

21
0

लियाकत शाह

भुसावळ , दि. १५ :- भुसावळ स्पोर्टस् आणि रनर्स असोसिशन आयोजित ‘बी सारा लेडीज ईकव्यालिटी रन’ च्या स्पर्धकांसाठी ट्रेनिग सेशन्सला गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता शशीकला लाहोटी या नवोदित महिला धावपटूंच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी समन्वयिका डॉ. नीलिमा नेहेते, डॉ.चारुलता पाटील, प्रा.प्रवीण फालक, सचिन अग्रवाल, सीमा पाटील, ब्रिजेश लाहोटी, सचिन मनवानी, नितीन पाटील, प्रवीण वारके, रणजीत खरारे, प्रवीण पाटील उपस्थित होते. धावपटूंमध्ये अपूर्व उत्साह प्रथम महिला धावपटूंना वॉर्म अपचे महत्व सांगण्यात आले व त्यानंतर सर्वांनी वॉर्म अपला सुरुवात केली. त्यानंतर या नवोदित महिला धावपटूंना धावण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. धावण्याचे अंतर, वेग, श्वासोश्वास आदी गोष्टीत लक्ष देऊन हळूहळू धावायला सुरुवात झाली. यावेळी नवीन धावपटूंचा उत्साह व आनंद वाखाणण्याजोगा होता. धावल्यानंतर योग शिक्षिका पूनम भंगाळे यांनी उपस्थित महिलांना स्ट्रेचिंगचे वेगवेगळे प्रकार शिकविले. या ट्रेनिंग सेशनला सरोज शुक्ला, पूनम कुलकर्णी, चारुलता अजय पाटील, कंगना मनवाणी, कांचन पाटील, स्वाती फालक, ज्योत्स्ना पाटील, ममता ठाकूर, वेदश्री फालक, निशा गुमनानी, पूजा मोहनानी, क्रीपा मूलचंदानी, मयुरी आहुजा, यशोधरा शिरसाठ, भारती राठी, ज्योती पाटील, मीना नेरकर, चंचल भोळे आदींची उपस्थिती होती.