Home जळगाव ज्ञानज्योत आदान-प्रदान आणि सदिच्छा कार्यक्रम संपन्न

ज्ञानज्योत आदान-प्रदान आणि सदिच्छा कार्यक्रम संपन्न

200

शरीफ शेखभुसावळ , दि. १४ :- येथील महाराणा प्रताप विद्यालयात इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभा मध्ये सदिच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मा. श्री सोनुभाऊ मांडे यांनी विद्यार्थ्यांना “पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयातील जीवनात तुमच्यासोबत संस्थेने आणि शाळेने केलेले संस्कार सदैव असतील. तेव्हा कोणत्याही समस्यांमध्ये न डगमगता शिक्षण घ्या. तुमच्यासाठी आता शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी आहेत. त्यांची निवड करताना भविष्यातील नोकरी-व्यवसाय व उद्योग यांचा वेध घ्या. आपल्या क्षमता आणि मर्यादांच्या पलीकडे जाऊन अपार कष्ट करा.” असा सल्ला दिला.यावेळी मुख्याध्यापक श्री सुरेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना घ्यावयाची काळजी, करावयाचा अभ्यास यासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री सोनुभाऊ मांडे, सचिव श्रीमती उषाताई पाटील, मुख्याध्यापक श्री सुरेश शिंदे, पर्यवेक्षिका सौ मंगला मोरे हे होते. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना ज्ञान-एकता व चारित्र्य यांची प्रतीक असलेली ज्ञानज्योत व प्रतिज्ञा दिली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट वस्तू दिली. विद्यार्थ्यां तर्फे जयेश तायडे, प्रेमकुमार परदेशी, रजत माने, प्रसाद लोंढे तर शिक्षकां तर्फे श्री नारायण घोडके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आशिष सैतवाल परिचय श्री सुधाकर सपकाळे व आभार सौ मानसी कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी सहकार्य केले.