Home विदर्भ अनसिंग येथे मोफत कानाची तपासणी व श्रवन यंत्राचे वाटप

अनसिंग येथे मोफत कानाची तपासणी व श्रवन यंत्राचे वाटप

49
0

अनसिंग – वार्ताहर

वाशिम , दि. १४ :- निवासी मूकबधिर विद्यालय, अनसिंग जिल्हा वाशिम येथे दिनांक 18 फेब्रुवारी 2020 रोजी मोफत कानाची तपासणी व श्रवन यंत्राचे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
डायरेक्टर, अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसाबिलिटी (दिव्यांगजन) बांद्रा वेस्ट मुंबई तथा स्व. परमपूज्य लिमये बाबा शिक्षण संस्था व्दारा संचालित, निवासी मूकबधिर विद्यालय अनसिंग व श्री स्वामी समर्थ विशेष शिक्षक प्रशिक्षण संस्था अनसिंग ता. जिल्हा वाशिम ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 फेब्रुवारी 2020 रोजी मोफत तपासणी व मोफत श्रवन यंत्राचे वाटप करण्यात येत आहे. त्याकरिता विकलांग प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला, आधार कार्ड, राशन कार्ड, रहिवासी दाखला, चार पासपोर्ट फोटो अश्या वरील कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांनी मोफ़त तपासणी आणि श्रवन यंत्राचा लाभ घ्यावा,त्याकरिता संपर्क साधावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक नितीन कोल्हे मो. नं 8378904269,
नरेंद्र कोवे मो. नं.9158848414
ह्यांनी केले आहे.