Home मराठवाडा ग्रामीण डाक जीवन विमा घेतल्यास भविष्यात आर्थिक आधार मिळते – सुरेश सिंगेवार

ग्रामीण डाक जीवन विमा घेतल्यास भविष्यात आर्थिक आधार मिळते – सुरेश सिंगेवार

126

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

ठाकरवाडी इस्लापुर दि.१४ :- रोजी नांदेड डाक या अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण ग्रामीण डाक बिमा गाव करण्यासाठी डाक विभागाने ठाकरवाडी या या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे एक विमा देण्यासाठी एक व्यक्ती एक पॉलिशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेडचे मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना म्हणाले की ग्रामीण भागातील नागरिकांना कमी हप्ता जास्त बोनस देण्यासाठी आज डाक विभागाच्या वतीने ग्रामीण डाक जीवन विमा योजनाचा लाभ घेतल्यास भविष्यात या माध्यमातून बचत होते आणि एकरकमी मोठी रक्कम मुदतीच्या नंतर मिळते व विमा धारकास कांही झाल्यास विमा धारकाच्या वारसाला आर्थिक आधार मिळते असे सिंगेवार यांनीं सांगितले.
हा कार्यक्रम कोसमेटचे शाखा डाकपाल संजय राठोड यांनी आयोजित केला होता.
पुढे बोलताना सिंगेवार म्हणाले की ग्रामीण भागातील नागरिकांना खाजगी विमा कंपन्या येऊन खोटे नाट्य सांगून पैसे घेऊन जातात आशा लोकांन पासुन जनतेनी सावधगिरी बालगावी लागते. आपल्या गावात पिढ्यानपिढ्या पासून पोस्ट ऑफिस आहे ही ग्रामीण डाक विमा योजना ही पोस्ट ऑफिस आपल्या गावात पैसे भरण्याची व्यवस्था बाहेर गावी जाण्याची गरज नाही. असे सिंगेवार यांनी सांगितले या कार्यक्रमाला सरपंच फोले व गावातील नागरी उपस्थित होते.
आज या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे एक डाक जीवन विमा घेऊन हे गाव ग्रामीण डाक जीवन विना “संपूर्ण गाव विमा’ करण्यात आले आहे.
हे संपूर्ण गाव डाक विमा करण्यासाठी शंकर डोंशनवार शिवणी,संजय राठोड नांदगाव, ज्ञानेश्वर नूनेवार भिसी,संजय राठोड मुळझरा, सुधाकर जाधव कंचली यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू फोले यांनी केले आहे.