
प्रतिनिधी – रवि गवळी
मुंबई , दि. १३ :- मालाड पी उत्तर विभागभ्रष्टाचार हेच अनधिकृत बांधकामांचे मूळ आहे, यावर मात्र सत्ताधारी, विरोधक, लोकप्रतिनिधी आणि जनतेचेही एकमत झाले, आणि कुणा एकावर जबाबदारी न ढकलता, सामूहिक जबाबदारीने या समस्येचा सामना केला पाहिजे,, मालाड-मालवणी येथील एका इसमाचे बैठया चाळीतील घराचे दुरूस्तीचे काम घेतलेले होते. सदर दुरूस्तीचे काम ठेकेदार हे करीत असताना पी उत्तर इमारत कारखान्यातील मुकादम प्रकाश दुबे यांनी सदर ठिकाणी भेट देवुन दुरूस्तीचे काम पुढे चालु ठेवण्याकरीता रू.२०,०००/-लाचेची मागणी केली होती. परंतू फिर्यादी ला वारंवार फोन करून चालू असलेल्या बांधकामावर जाऊन दम दाटी देत होते आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पैसे दिले नाही तर आम्ही बांधकामवर तोडक कार्यवाही करू असे ठेकेदारास मानसिकत्रास लोकसेवक देत होते प्रकाश दुबे वरिष्ठच्या आदेशाने अनधिकृत बांधकामावरून पैसे गोळा करीत असल्याचे सूत्रांनी माहिती दिली ठेकेदार याना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी, मुंबई येथे ठेकेदार यांनी लेखी तकार अर्ज दिला होता. दिलेल्या तकारीवरुन रोजीच्या पडताळणी दरम्यान लोकसेवक यांनी रु. १०,०००/-रक्कमेच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे रचण्यात आलेल्या सापळा कारवाईच्या वेळी लोकसेवक यांनी सांगितलेप्रमाणे फिर्यादी यांच्याकडून आरोपी खाजगी इसमास चायवाला जगदिश डोंगरजी पटेल लाचेची रक्कम रू. १०,०००/- स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर लोकसेवक यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.,अनधिकृत बांधकामांना सरकारच जबाबदार असल्याचे मानणाऱ्या जनतेने अधिकाऱ्यांवरही दबाव आणला पाहिजे, असा सूरही उमटला आणि प्रामाणिकपणातून पैसा मिळतच नसल्याने भ्रष्टाचार वाढल्याची खंतही व्यक्त झाली.