Home मराठवाडा खोट्या कागदपत्रा व्दारे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याऱ्या भूमाफिया विरोधात गुन्हा दाखल

खोट्या कागदपत्रा व्दारे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याऱ्या भूमाफिया विरोधात गुन्हा दाखल

30
0

सययद नजाकत

जालना , दि. १३ :- खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे खरेदी-विक्री खत बनवून लोकांची व शासनाची कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी २१ जणांविरूध्द सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अरूण श्रीकिशन अग्रवाल यांनी केलेल्या फिर्यादीनुसार जालना येथील सर्वे क्र.१७३ भाग मिळकत वर्ग दोन प्रकारातील असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अकृषीक परवाना अथवा प्लाटींग करावयाची असल्यास त्याबाबत रितसर अर्ज शासनदरबारी जमा केल्यानंतरच संबंधित शासकीय अधिकारी मिळकतीबाबतचे योग्य तो परवाना जारी करू शकतात असे असले तरी रंगनाथ आप्पा काटकर, लक्ष्मण तुकाराम आप्पा काटकर यांनी त्यांच्या सोबतच्या मदतनिसांनी एकत्र येवून कटकारस्थान रचून सर्वे क्र.१७३च्या अकृषित परवानगी प्राप्त करण्यासाठी अर्ज दाखल केले. त्यासोबत गटातील सर्वेमधील लगतच्या शेतकर्‍यांनी महसूल नजराणा रक्कम व त्याबाबतचे आदेश संचिकेमध्ये समाविष्ट केले आणि याद्वारे शासकीय अधिकार्‍यांची दिशाभूल करून स्वत:च्या फायद्यासाठी गट क्र.१७३बाबत कोणतीही शासकीय रक्कम अदा न करता तसेच अकृषीत परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या सदरील जमीन/ मालमत्तेमध्ये पीआर कार्ड काढून सदरील दस्ताऐवज खरे असल्याचे भासून त्याचा गैरवापर करून खरेदी-विक्री खत बनवून लोकांची व शासनाची कोट्यावधींची फसवणूक केली आहे. हे प्रकरण २०१७ ते २०१९ दरम्यान घडले आहे. काटकर कुटुंबिय हे भूमाफिया असून त्यांनी शासनाचा महसूल भरून स्वत:चा आर्थिक फायदा करण्यासाठी रंगनाथआप्पा काटकर, प्रकाश रंगनाथ काटकर, लक्ष्मण तुकारामआप्पा काटकर, कचरू लक्ष्मणआप्पा काटकर, नारायण लक्ष्मणआप्पा काटकर, वैâलास लक्ष्मणआप्पा काटकर, शिवा लक्ष्मणआप्पा काटकर, निरंजर रंगनाथआप्पा काटकर, केशरबाई रंगनाथआप्पा काटकर, अमोल प्रकाशआप्पा काटकर, भास्कर तात्याराव खुळे, सुमनबाई पाराजीआप्पा औरंगे, सुमनबाई लक्ष्मणआप्पा औरंगे, गंगा अशोक नामदे, सुनिता रंगनाथ परळकर, हर्ष सुनिल बोरा, सौ.श्रीया दिपक गेलडा, सचिन भानुदास मिसाळ, रश्मी विनोद भरतीया, संतोष पन्नालाल करवा व इतर अज्ञात लोकांनी संगणमत करून षडयंत्र रचून शासकीय अधिकार्‍यांची दिशाभूल केली आहे. यावरून सदरील आरोपींविरूध्द सदर बाजार पोलिस ठाण्यात भादंवि ४२०, ४६८, ४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Unlimited Reseller Hosting