
सर्वत्र चर्चा…!!
देवानंद खिरकर
अकोला / अकोट , दि.१३ :- राज्याच्या ईतीहासात एखाद्या अधिकार्याने कुणा मंत्र्यांना जाहीररीत्या काही भेट वस्तू दिल्याचे आज पर्यंत पाहण्यात आलेले नाही.अधिकारी मंत्र्यांना भेट देतातही मात्र अंधारात किवा चार भिंतीच्या आत.महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान मंत्रीमंडळातील एका मंत्र्याला एका अधिकार्याने मात्र भेट दिली आणि तिही जाहीररीत्या .याचे सर्वत्र आशचर्य व्यक्त केल्या जात आहे.हा मंत्री दूसरा ,तिसरा कोनी नसुन तब्बल चौथ्यांदा निवडुण आलेले अचलपुरचे प्रहारचे आमदार आनि राज्य मंत्री मंडळ सदस्य अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चूभाऊ कडु हे आहेत.अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या तर्फे बच्चभाऊंना घोडा भेट देण्यात आलेला आहे.या अगोदरची पार्श्वभुमी अशी जिल्हा क्रीडा अधिकार्यांना स्वता आपल्या निधीतून महाराष्ट्रात गाडी भेट देणारे पाहिले आमदार बच्चूभाऊ कडु होते. त्यांच्या या कामाची परतफ़ेड म्हणून मंत्री झाल्यावर क्रिडा अधिकारी जाधव यांच्या तर्फे बच्चूभाऊंना घोडा भेट देण्यात आला आहे.
मत्र्यांना घोडा भेट म्हणून दिल्या बद्दल सर्वत्र या बाबत आचर्य व्यक्त केल्या जात असुन भेट देणारा व घेणारा दोघांचेही कौतुक होत आहे, अधिकाऱ्याने दिलेल्या या भेटीचा बच्चू भाऊ नि ही मोठ्या आनंदात स्वीकार केला आहे .











































