
यवतमाळ – कोलाम समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी, तसेच ‘शामा दादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग’ स्थापन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी काढण्यात आलेल्या ‘पायदळ लाँग मार्च’ ची सांगता आज सोमवारी यवतमाळ येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात झाली.













































