Home यवतमाळ दारव्हा नजीक पिंम्प्री येथे 24 एप्रीलला गौतमी पाटील यांच्या लावणीचा ठसका…!

दारव्हा नजीक पिंम्प्री येथे 24 एप्रीलला गौतमी पाटील यांच्या लावणीचा ठसका…!

605
दारव्हा – प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा बहारदार लावणीचा ” गौतमी पाटील ग्रॅन्ड शो ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम मनमोहनसिंग चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने दारव्हा शहरा नजीकच्या पिंम्प्री ( फाटा ) येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. ३० मार्च ऐवजी २४ एप्रिल रोजी सायंकाळी पिंप्री ( फाटा ) येथे रंगणार आहे.
महाराष्ट्रभर आपल्या ठसकेबाज लावणी सादरीकरणामुळे चर्चेत असलेल्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाची रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमासाठी मनमोहनसिंग चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत असून परिसरातील नागरिकांसाठी हा कार्यक्रम सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.