Home वाशिम खिसा कापुन चोरी करणार्‍या अट्टल चोराला वाशिम स्थनिक गुन्हे शाखा यांनी ठोकल्या...

खिसा कापुन चोरी करणार्‍या अट्टल चोराला वाशिम स्थनिक गुन्हे शाखा यांनी ठोकल्या बेड्या

396

 

फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षात वाशिम पोलीसांनकडुन धडक मोहिमा राबवुन वाशिम जिल्ह्यात गुन्हे करणारे गुन्हेगार यांना अटक करुन बेड्या ठोकल्या आहेत. तसेच वाशिम मध्ये खिसा कापुन पैसे चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्यात आले आहे.
दिनांक 20/02/2026 रोजी वाशिम जिल्ह्यामधिल ग्राम शिरपुर येथे जानगिर महाराज यात्रा निमित्य कुस्तीचे सामने ठेवण्यात आले होते. तेथे एका इसमाच्या खिश्यातुन नगदी 50,000/- रुपये चोरी गेल्याची घटना घडली. वरुन पोलीस स्टेशन शिरपुर येथे अपराध क्र 102/26 कलम 303( 2 ) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी एक टिम तात्काळ तयार करुन शिरपुर येथे रवाना केली. स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील टिम ने घटनास्थळा जवळील तसेच परीसरातील बरेच सिसिटीव्ही चेक केले. त्यावरुन सदर आरोपी निष्पन्न करुन तो अकोला येथे राहत असल्याचे समजले. आज दिनांक 27/02/2026 रोजी सदर आरोपीची माहिती घेतली असता यातील आरोपी हा पुन्हा चोरी करण्याकरीता वाशिम येथे कडे येत असल्याबाबत माहिती मिळाल्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने मालेगांव येथे सापळा रचुन यातील आरोपी यास अकोला नाका येथुन मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नांव विचारले असता त्याने त्याचे नांव अब्दुल आरीफ मोहम्मद रसुल वय 26 वर्ष रा. जुने शहर अकोला जि. अकोला असे सांगीतले वरुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांने शिरपुर येथे चालु असलेल्या कुस्ती सामन्याच्या गर्दीचा फायदा घेवुन वरील फिर्यादीच्या खिश्यातील नगदी 50,000/- रुपये चोरुन नेल्याची कबुली दिली. त्याचे कडुन गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल नगदी 50,000/- रुपये हस्तगत करण्यात आला. सदर आरोपीस पोलीस स्टेशन शिरपुरच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास चालु असुन सदर आरोपीने आणखी कोठे कोठे चोऱ्या केल्या याबाबत माहिती घेणे सुरु आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदिप अगरवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सपोनि योगेश धोत्रे व टिमने अथक परीश्रम घेतले आहे.