Home वाशिम चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे ०७ गुन्हे उघड करुन केला ९५९००० / –...

चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे ०७ गुन्हे उघड करुन केला ९५९००० / – रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

90

वाशिम पोलीस दलाची दमदार कामगिरी

चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे ०७ गुन्हे उघड करुन केला ९५९००० / – रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्ह्यातील गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी अनुज तारे, पोलीस अधीक्षक वाशिम यांनी मालमत्ते विरुध्द गुन्हे उघडकीस आणने बाबत आदेश दिले होते.त्यानुसार प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्या बाबत आदेशीत केले.
दि.३०/०१/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम पथकातील अधिकारी / अंमलदार मालमत्ते विरुध्दच्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, इसम नाम करण एकनाथ वंजारे रा. खेर्डा ता. मालेगांव जि. वाशिम हा त्याचे साथीदारासह घरफोडीमध्ये चोरी केलेले सोने विक्री करीता वाशिम येथे येणार आहे. अशी गुप्त बातमीदारांकडुन खात्रीलायक बातमी मिळाली वरुन पंच व पोस्टाफसह जावुन नमुद आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांची कायदेशीर रित्या झडती घेतली असता त्यांचे जवळ ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व नगदी ५००० /- रुपये मिळुन आले. सदर मुद्देमाला बाबत विचारपुस केली असता त्यांनी पो.स्टे साखरखेर्डा जि. बुलढाणा अप. कं ४५ / २०२६ क. ३३१ (४), ३३१ (६), ३०५ (अ) भान्यासं, पो.स्टे मालेगांव येथे अप कं ६२६/२०२५ क ३३१ (४), ३०५ (अ) भा. न्या. सं तसेच पो.स्टे आसेगांव ३६४ / २०२५ क.३०९ (४), ३(५) भा.न्या. सं गुन्हयांची कबुली दिली वरुन त्यांचे ताब्यातुन सोन्याचे दागिणे, नगदी रक्कम, गुन्हयात वापरण्यात आलेल्या ०२ मोटर सायकल, ०२ मोबाईल असा अंदाजे ९०००००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.तसेच समृध्दी माहामार्गावरील वाढते डिझल चोरीचे घटने संबंधाने वरिष्ठांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील पथकाने समृध्दी महामार्गावरील डिझेल चोरीतील आरोपीतां अथक परिश्रम घेवुन गुन्हयाचा तांत्रीक तपास करुन व गोपनिय बातमीवरुन पोलीस स्टेशन कारंजा शहर येथील अपराध नंबर ७६८ / २०२५ क. ३०३(२) भा.न्या. सं अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आणुन सदर गुन्हयातील आरोपी नामे १) प्रतिक प्रभाकर साळवे वय १९ वर्ष, रा. हिवरा ता. जाफराबाद जि. जालना २) सागर रमेश हिवराळे, वय २८ वर्ष, रा. सिंधी ता. जाफराबाद जि. जालना यांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्यात आली. तसेच पोलीस स्टेशन मालेगांव येथील पथकाने समृध्दी महामार्गाशी संबंधीत अप.क्रं १ ) ६१९ / २०२५ कलम ३०३ (२) भान्यास २) ६१८ / २०२५ क. ३०३ (२) भान्यासं अन्वये दाखल ०२ गुन्हे उघडकीस आणुन गुन्हयातील आरोपी नामे अलीम खान मुस्ताक खान पठाण, वय २३ वर्ष, रा. टेंभुर्णी ता. जाफराबाद जि. जालना याचा शोध घेवुन त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच मालेगांव येथे जेब कटींग संबंधाने दाखल अप कं १४६/२०२६ क.३०३ (२) भा. न्या. सं गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयात सराईत जेब कटर आरोपी नामे शेख सत्तार शेख दादामिया रा. नालसाहबपुरा वाशिम यास ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरी गेलेले नगदी ९००० /- रु हस्तगत करण्यात आले. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम तसेच पोलीस स्टेशन मालेगांव येथील पथकाने ०१ जबरी चोरी, ०२ घरफोडी, ०३ चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन वेगवेगळ्या गुन्ह्यात ९५९००० / – रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक लता फड उपविभागीय पोलीस अधीकारी, कारंजा प्रदीप पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथकातील अधिकारी / अंमलदार व पोलीस स्टेशन मालेगांव येथील अधिकारी अंमलदार यांनी अथक परीश्रम घेतले आहे.