मराठवाडा

वार्डाच्या सर्वागीण विकासासाठी निवडणूकीच्या रिंगणात – अब्दुल कय्युम

अमीन शाह

औरंगाबाद , दि. ११ :- जनतेच्या आग्रहास्तव मी मनपाची निवडणूक लढवत असून सर्व जातीधर्मांच्या लोकांचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे.
औरंगाबाद येथील समाज सेवक तथा पत्रकार अब्दुल कय्युम यांनी वर्डा क्रमांक 32भडकल गेट येथून महानगर पालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून याच अनुषंगाने उज्वल महाराष्ट्राच्या प्रतिनिधीनी त्यांची भेट घेऊन संवाद साधला या वेळी ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की वर्डाच्या सर्वगीण विकासासाठी मी निवडणूक लढविणार असून याच अनुषगांने पाऊल टाकण्यात आले असून या निर्णयाचा वार्डातील नागरिकांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहे.सेवा,सुरक्षा,विकास,या मुद्द्यांवर ही निवडणूक लढविण्यात येणार आहे.असेही शेवटी अब्दुल कय्युम म्हणाले.

अब्दुल कलाम यांना सर्व जाती-धर्मात मानणार वर्ग मोठा असून त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण जाणीव आहे.ते जनशक्ती च्या जोरावर महानगर पालिकेत प्रवेश करतील यात मात्र शंका नाही.वर्डाला उच्चशिक्षित उमेदवार मिळाल्यामुळे येथील नागरिकांनीही समाधान व्यक्त करुन त्यांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...