
अमीन शाह
विद्यार्थिनी वर दोन नराधम शिक्षकांनी अत्याचार केल्याची बीड ची घटना ताजी असतांना आज पुन्हा राज्याच्या शिक्षण विभागात विद्यार्थ्यांवर अत्याचाराच्या दोन घटना समोर आल्या आहेत घडलेल्या या गंभीर घटनांमुळे शिक्षण विभागाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे का असे वाटते ,
शिक्षिकेने केला विद्यार्थ्याचा लैंगिक शोषण ,
मुंबईतील एका नामांकित शाळेमध्ये भयंकर घटना घडली. एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला जबरदस्ती शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. ही शिक्षिका या विद्यार्थ्याला इंग्रजी शिकवत होती.
पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिस करत आहेत. वर्षभरापासून ही शिक्षिका या विद्यार्थ्याचा छळ करत होती. ही सर्व भयंकर घटना आणि शिक्षिकेचा खरा चेहरा कसा समोर आला याची धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिसांनी सांगितले की, ही शिक्षिका विद्यार्थ्याला एका वर्षापासून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत होती. ती या विद्यार्थ्याला आपल्या कारमध्ये बसवून अज्ञातस्थळी घेऊन जायची आणि त्याठिकाणी त्याला कपडे काढायला सांगून त्याच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवत होती. अनेकदा तिने दारू पाजून या विद्यार्थ्याला ५ स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाऊन त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवले.
विद्यार्थ्याच्या पालकांना त्याच्या वागण्यामध्ये बदल दिसून आला तेव्हा त्यांनी विश्वासात घेत त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपल्या कुटुंबीयांना हे भयंकर प्रकरण सांगितले. या विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत दूर राहण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्याला त्रास देणं थांबवले नाही. शिक्षिकेचे हे कृत्य पाहून विद्यार्थी खूपच अस्वस्थ राहू लागला. त्यावेळी ही शिक्षिका त्याला अँटी एन्जायटी पिल्स देत होती.
ही शिक्षिका पीडित विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईव्यतिरिक्त वेगवेगळ्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेली होती. पोलिसांनी सांगितले की, शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी ही शिक्षिका या विद्यार्थ्याला दारू पाजत होती. कधी कार, कधी हॉटेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी या शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. या शिक्षिकेविरोधात विद्यार्थ्याच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तिला अटक केली.
शिक्षकाच्या छळामुळे विद्यार्थ्यांने केली आत्महत्या
जिल्हा ,बुलडाणा
एका शिक्षकाच्या छळामुळे विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली. शिक्षकाने प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्याला उत्तर विचारले होते. उत्तर न आल्याने शिक्षकाने शारीरिक शिक्षा देऊन विद्यार्थ्याला भर वर्गात चड्डी काढण्याची धमकी दिली व अपमानित केल्यामुळे विद्यार्थ्यांने आपली जीवन यात्रा संपवून टाकली. विनायक महादेव राऊत (वय15) रा. वसाडी बु.असे
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे तर आरोपी शिक्षकाचे नाव गोपाल मारोती सुर्यवंशी रा. खामगाव जिल्हा बुलडाणा असे आहे.
विनायक महादेव राऊत हा विद्यार्थी जय बजरंग विद्यालयात शिकत होता. वर्गात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे वर्गशिक्षक गोपाल सुर्यवंशी यांनी त्याला उठबश्या काढायची शिक्षा दिली. विनायकने पाय दुखत असल्याचे कारण सांगून ऊठबशा काढण्यासाठी नकार दिल्याने शिक्षकाने त्याला कपडे काढण्यासाठी सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान या मानसिक धक्क्यामुळे अपमानित झालेल्या विनायकने आत्महत्या केली या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ,












































