Home अमरावती गुन्ह्याचा सूत्रधार “अंकेश जयस्वालला” अटक कधी होणार?

गुन्ह्याचा सूत्रधार “अंकेश जयस्वालला” अटक कधी होणार?

460

“या गुन्ह्याचा सूत्रधार अद्यापही मोकाट… जनतेत संतापाचं वातावरण!”

अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरमध्ये शस्त्रसाठा उघडकरण्यात आला होता पिस्टल, तलवारी, रॉड सह सात जणांना अटक करण्यात आले होते….

अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर गावात एक मोठा गुन्हेगारी कट उघडकीस आला आहे. कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत गावातील एका टोळीच्या ताब्यातून पिस्टल, धारदार तलवारी आणि लोखंडी रॉडसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.या प्रकरणी पोलिसांनी सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. शस्त्रसाठा नेमका कशासाठी वापरण्यात येणार होता? कुठल्या मोठ्या गुन्ह्याची तयारी सुरू होती का? हे सर्व तपासाअंतर्गत येणाऱ्या पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
कोणालाही शस्त्र बाळगण्याची किंवा गैरकायदेशीर कृतीत सहभागी होण्याची माहिती असल्यास, तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कुऱ्हा पोलिसांनी नागरिकांना केले आहे…
या सातही गुन्हेगारांना एकत्रित आणणारा मास्टरमाइंड जयस्वाल दाम्पत्य सध्या फरार असल्याची माहिती मिळत आहेत. पोलिसांनी सात जणांना अटक केली असली तरी या गुन्ह्याचे खरे सूत्रधार अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेले नाहीत.
सामान्य जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे. गुन्हेगार मोकाट असताना कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.”आम्ही न्याय मागतोय, फक्त आश्वासन नाही!” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. पोलिसांची कारवाई अपुरी का? फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक कधी तयार होणार?
जनतेच्या मनात असणारे हे प्रश्न आता अधिकच तीव्र झाले आहेत….