Home छ. संभाजीनगर गार्डन पहायला गेले अन , विपरितच घडले ,

गार्डन पहायला गेले अन , विपरितच घडले ,

933

 

दोन पर्यटक महिलांचा मृत्यू एक गंभीर जखमी ,

अमीन शाह

छत्रपती संभाजीनगर ,

आज संध्याकाळी 6 वाजता अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या सिदार्थ गार्डन ची भीत अचानक पडली यात दोन महिला पर्यटकांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार
शहरातील सिद्धार्थ गार्डनमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृतांची नावे समोर आली आहेत. स्वाती अमोल खैरनार (वय ३७, रा. धामणगाव, ता. चाळीसगाव जि. जळगाव, ह. मु. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज) आणि रेखा हरिभाऊ गायकवाड (वय ६५, गजानननगर, टीव्ही सेंटर, हडको) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे असून, शेख अकील असे गंभीर जखमी चा नाव आहे त्याला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे , घडलेल्या घटने मुळे दुःख वयकत केले जात असून भीत पडल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे ,
सिद्धार्थ गार्डनच्या मुख्य गेटवरील डोमजवळील भिंत कोसळली. दोन महिलांसह एक पुरुष मलब्याखाली दबले. नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्य केले. तिघांनाही घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोन महिलांचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमी पुरुषावर उपचार सुरू आहेत. आणखी एका पुरुषासह चार लहान मुलेही किरकोळ जखमी झाली आहेत. पालक त्यांना लगेचच घेऊन गेल्याने ओळख समोर आलेली नाही. मोठ्या वादळामुळे शहर अक्षरशः हादरून गेले. सर्व धुळीचे लोट पसरले होते. जवळपास अर्धा तास हे तुफान शहरात घोंगावत होता ,