Home यवतमाळ तिसऱ्या प्रयत्नात आयएएस – डॉ.जयकुमार आडे यांची जिद्दीची यशोगाथा!”

तिसऱ्या प्रयत्नात आयएएस – डॉ.जयकुमार आडे यांची जिद्दीची यशोगाथा!”

467

यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक कुटुंबातून घडलेला अधिकारी

शिकवणारे वडील,साधी ग्रामीण पार्श्वभूमी,पण डोळ्यांत मोठं स्वप्न – डॉ.जयकुमार आडे यांनी आपल्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युनियन पब्लिक सर्विस कमिशन) परीक्षेत ३०० वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.विशेष म्हणजे त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतरही आयएएसची वाट न सोडता तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं.
जयकुमार यांचे वडील शंकर आडे हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून,आई गृहिणी.अशा साध्या घरातून आलेल्या जयकुमार यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे वेगळाच आदर्श घालून दिला आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण आर.के.एस.पब्लिक स्कूल, दहावीपर्यंतचं शिक्षण यवतमाळ पब्लिक स्कूल,तर अकरावी-बारावी आर.एल.टी.कॉलेज,अकोला येथून झाले.एम.बी.बी.एस.बी.जे. मेडिकल कॉलेज,पुणे येथून पूर्ण केल्यानंतर त्यांनी अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओलॉजीमध्ये एम.डी.करत असतानाच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू ठेवली.
एम.बी.बी.एस.नंतर त्यांनी नेर तालुक्यातील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली. अभ्यास आणि सेवा यांचा समतोल साधत त्यांनी घरूनच ऑनलाइन कोचिंगद्वारे तयारी करत अखेर यश संपादन केलं.
जयकुमार यांना दोन बहिणी – स्नेहा (एम.एससी.) आणि आदिती (डी.एड.) आहेत.त्यांच्या वडिलांनी दैनिक अजिंक्य भारतशी बोलताना सांगितले, “जयला लहानपणापासून यूपीएससी चं स्वप्न होतं.वैद्यकीय शिक्षण पूर्ण करूनसुद्धा त्याने हे स्वप्न सोडलं नाही.आज तो आयएएस झालाय, ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे.”

शुभेच्छुक —
कॉम्रेड सचिन मनवर मित्रपरिवार,यवतमाळ.
(चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणारे सर्वच पँथर)