Home यवतमाळ पहलगाम येथे जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास माहिती द्या

पहलगाम येथे जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास माहिती द्या

749

जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन

यवतमाळ, दि.२३ : जम्मू कश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यु झाला असून काही पर्यटक जखमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक पहलगाम येथे अडकले असल्यास त्याची माहिती जिल्हा प्रशासनास देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

मदतीसाठी जम्मू काश्मीर शासनाच्या वतीने हेल्पलाईन सुरु केले आहे. त्यात दुरध्वनी क्रमांक 0194-2463651, 2457543, 2483651 व व्हाट्सअँप क्रमांक 7780805144, 7780938397, 7006058623 असा आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे क्रमांक 07232-240720, 07232-255077, 07232-240844 असे आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी तथा श जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन गायकवाड यांचा दुरध्वनी क्रमांक 07232-242488 असा आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मून यांचे संपर्क क्रमांक 8308754473, 8668784847 असे आहेत. जिल्ह्यातील कोणी पहलगाम येथे अडकले असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री.मीना यांनी केले आहे.