Home यवतमाळ यवतमाळ जिल्हा मुद्रक असोसिएशनच्या वतीने उत्साहात ईद मिलन सोहळा संपन्न…

यवतमाळ जिल्हा मुद्रक असोसिएशनच्या वतीने उत्साहात ईद मिलन सोहळा संपन्न…

302

यवतमाळ, दि. २२: जिल्हा मुद्रक असोसिएशनच्या वतीने शहरातील बचत भवन येथे मोठ्या उत्साहात ईद मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला शहरातील अनेक मुद्रक व्यावसायिक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआनच्या पठणाने झाली. त्यानंतर असोसिएशनच्या अध्यक्षांनी व सदस्यांच्या वतीने उपस्थित मुस्लिम बांधवांना शाल व टोपी देऊन त्यांचा सत्कार केला तर युवा व्यावसायिक वसीम मवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. व ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि एकोपा व सलोख्याचे महत्त्व विशद केले. त्यांनी मुद्रण व्यवसायातील सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हानांविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अनेक सदस्यांनी मनोगते व्यक्त केली, ज्यात त्यांनी ईदच्या आनंदाच्या क्षणांना उजाळा दिला आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. उपस्थितांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली, ज्यामुळे वातावरण अधिक आनंदी आणि उत्साही बनले होते.
सोहळ्यामध्ये पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. उपस्थितांनी विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. लहान मुलांसाठी खेळण्यांची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे त्यांनीही या सोहळ्याचा पुरेपूर आनंद लुटला.
जिल्हा मुद्रक असोसिएशनच्या या ईद मिलन सोहळ्यामुळे शहरातील मुद्रक व्यावसायिकांना एकत्र येण्याची संधी मिळाली, तसेच सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढण्यास मदत झाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे आभार मानले. यावेळी साबीरभाई, वसीम मवाल, रियाझोद्दीन काझी, रहीमभाई नुरी, रिजवान सैयद, शहेजाद अहेमद, सलीम खान, झहीर काजी, मुजाहिद खान विशाल भोळे, प्रफुल नागपुरे, सुरज जावंधिया, नरेश धुत,आनंद चिद्दरवार, निलेश भास्कररवार, उमेश शर्मा, किरण पोगडे, दिपक पतंगे, शिवाजी पतंगे, भास्कर वानखडे,सौरभ गाउत्रे, प्रविण नागपुरे, बसवेश्वर माहुलकर, सागर शेंडे, विजय सोरते,सैय्यद अमजद, हासिब राजा,शेख आतीफ, करण मुन ईत्यादी हजर होते.