
यवतमाळ, ता. २२ एप्रिल – विदर्भातील एक प्रमुख वैद्यकीय सेवा केंद्र म्हणून ओळखले जाणारे श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, यवतमाळ पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहे. अस्वच्छतेच्या तक्रारी, चोरीच्या घटना, सुरक्षेतील त्रुटी आणि कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.













































