Home यवतमाळ महागांव पं. स. शिक्षण विभागातील वसुली अधिकाऱ्यावर कार्यवाही करा…….मनसे

महागांव पं. स. शिक्षण विभागातील वसुली अधिकाऱ्यावर कार्यवाही करा…….मनसे

267

मनसेच्या वतीने जि. प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे यांना पुराव्यासह निवेदन सादर….

यावर्षी महाराष्ट्र शासनाने नवनियुक्त शिक्षण मंत्र्याच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर कॉपीमुक्त अभियान राबवून त्याची योग्य ती अंमलबजावणी करावी असे आदेश होते. याच आदेशाचा वेगळा अर्थ महागाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजय बेदेवाड यांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन त्या ठिकाण उद्याचा पेपर तुमचा कडक केला जाईल त्यासाठी पर्याय म्हणून तुम्हाला योग्य ती रक्कम द्यावी लागेल अशी
दमदाटी करून शिक्षकांकडून पठाणी वसुली केली . यासंदर्भात अनेक वृत्तपत्रात बातम्या येऊनही संबंधित विस्तार अधिकाऱ्याची कितीही चौकशी शिक्षण विभागामार्फत करण्यात आली नाही या विषयाची गंभीर दखल घेत मनसेच्या वतीने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात एक शिष्ट मंडळ आज जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.धोत्रे यांना भेटले. याप्रसंगी मनसेच्या वतीने संबंधित विस्तार अधिकार्‍यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तसेच या वसुली अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या शिक्षण विभागातील दोषींवर सुद्धा कारवाईची मागणी या प्रसंगी करण्यात आली

यासंदर्भात महागाव तालुक्यातील बारावीचे 11 केंद्र व दहावीचे तेरा केंद्र या सर्व ठिकाणी अशा प्रकारची धमकी वजा इशारा देण्यात आला.यामध्ये जास्तीत जास्त खाजगी शाळा होत्या त्यामुळे निकाल कमी लागला तर संस्थाचालकांना उत्तर द्यावे लागते या भीतीने कुठलीही कुरकुर न
करता सर्व शाळांनी रक्कम गोळा करून संबंधित विस्तार अधिकारी व त्यांचे चार-पाच सहकारी यांच्या हातात पैसे टाकले .परंतु हा अधिकारी शिक्षण परिषदेमध्ये माझ्याकडे गटशिक्षणाधिकारी चार्ज येणार आहे. त्यामुळे मी कोणतीही कारवाई करू शकतो अशा धमक्या देत असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही उघडपणे समोर येत नव्हता . या प्रकरणाची प्रत्यक्ष सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी तसेच त्यांना
निलंबित करण्यात यावे. सोबतच या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्याला सहकार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना
तात्काळ निलंबित करावे. संबंधित प्रकरण शिक्षण विभागाला काळीमा फासणारे असून या प्रकरणात कडक
कारवाई करणे गरजेचे असताना सुद्धा शिक्षण विभागाने एवढ्या गंभीर विषयात या विस्तार अधिकाऱ्याला पाठीशी घातले याला पाठीशी घालणाऱ्या विरोधात सुद्धा कडक कारवाईची मागणी याप्रसंगी अनिल हमदापुरे यांनी केली . यावर श्री. धोत्रे यांनी या प्रकरणात तात्काळ चौकशीचे आदेश देत शिक्षण विभागाला खडक पावले उचलण्याचे निर्देश दिले. संबंधित प्रकरणात योग्य कारवाई न केल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष देविदास शहाणे, उमरखेड तालुकाध्यक्ष सादिक शेख, सोनू गुप्ता, तुषार चोंडके, लकी छांगाणी, शिवम नांदुरकर, सौरभान अनसिंगकर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.