परळी येथे असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडीयम न्युजपेपर्स अॅन्ड एडीटर्सच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न
परळी (वैजनाथ) : केंद्र शासनाकडून नवनवीन शक्कल लढवून आणि राज्य शासनाकडून अडवणूक करत शासनाकडून लघू – मध्यम वृत्तपत्रांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडू असे प्रतिपादन असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडीयम न्युजपेपर्स अॅन्ड एडीटर्स संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव वाडकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले. असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडीयम न्युजपेपर्स अॅन्ड एडीटर्स च्यावतीने बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
देशभरातील लघू व मध्यम वृत्तपत्रांच्या संपादक, प्रकाशक, पत्रकार, मुद्रक यांच्या दैनंदिन, शासकीय अडचणी सोडविण्याच्या प्रमुख उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडीयम न्युजपेपर्स अॅन्ड एडीटर्स या संघटनेच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकार्यकारिणीचे पुनर्गठण करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीत राष्ट्रीय व राज्य कार्यकार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना संघटनेचे संस्थापक सहसचिव योगेश तुरेराव यांनी संघटनेची मागील आठ वर्षातील वाटचाल आणि संघटनेच्या एकूणच पुढील बांधणी आणि योजनांबद्दल माहिती दिली. संघटन मजबूत असल्याशिवाय कार्य करता येणार नाही आणि कार्य केल्याशिवाय संघटन मजबूत होणार नाही या चक्रात न अडकता कुठूनतरी सुरू करायचे या उद्देशाने नव्या कार्यकारिणीच्या गठण आणि घोषणेपासूनच त्याचे पुनःश्च हरिओम करीत आहोत असेही ते म्हणाले. तसेच मागील काळात संघटनेनेच लघु वृत्तपत्रांच्या अडचणी सोडविण्यासाठी यथाशक्ती कार्य केलेले आहेच यापुढे नव्या जोमाने कार्य करायचे आहे असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीत निवड करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनश्च उत्तमराव वाडकर यांची तर राष्ट्रीय सचिवपदी ईश्वरसिंह सेंगर यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी योगेश तुरेराव यांची तर उपाध्यक्षपदी संतोष धरमकर, विद्याधर देविदास, राजू पाटील, सहसचिवपदी श्रीनिवास धामणकर, कोषाध्यक्षपदी फिरोज लाखाणी, सहकोषाध्यक्ष राजेश डिडोळकर, संघटकपदी अनिल शिराळक, सहसंघटक पदी संजय निकस पाटील, महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. भारती मुरकुटे, राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य म्हणून संतोष निखारे, जगन्नाथ कामत, अजीत पाटील, गणेश शितोळे, विजयकुमार जुंजा, दिलीप जोशी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संतोष धरमकर, उपाध्यक्षपदी मोहन राठोड, प्रा. बलखंडे, भगवान परळीकर, सुनिल सचदेव सचिवपदी आशिष घुमे, सहसचिव अभिजीत गुप्ता, कोषाध्यक्षपदी प्रकाश दुबे, संघटक म्हणून प्रकाश ठाकूर , राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणून नागेश कलाल यांची निवड करण्यात आली.
राज्यातील विभागीय कार्यकारिणींच्याही अध्यक्षांच्या निवडी यावेळी जाहीत करण्यात आल्या. त्यात कोकण विभागाच्या अध्यक्षपदी आनंद लोके (देवगड), पुणे विभागाच्या अध्यक्षपदी औदुंबर ढावरे (सोलापूर), नाशिक विभागाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पावसे (नाशिक), औरंगाबाद विभागाच्या अध्यक्षपदी सय्यद मोईन, अमरावती विभागाच्या अध्यक्षपदी सुनिल सचदेव तर नागपूर विभागाच्या अध्यक्षपदी आनंद शुक्ला यांच्या नांवांची घोषणा करण्यात आली. तसेच कोल्हापूर, मुंबई व उपनगर, लातूर विभागाची कार्यकारिणी पुढील काळात घोषीत करण्यात येईल असे सांगण्यात आले.
यावेळी राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांचीही निवड करण्यात आली त्यामध्ये अमरावतीच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश कपूर यांची निवड करण्यात आली. यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक शिंदे, वर्धा जिल्हाध्यक्षपदी सुनिल गावंडे, बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी प्रेमचंद राठोड, चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी जीवन बागडे, गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्रकाश लालजीवाणी, सचिवपदी संगीता विजयकर, नांदेड जिल्हाध्यक्षपदी सचिन जोशी, धाराशिव जिल्हाध्यक्षपदी महादेव पाटील, पुणे जिल्हाध्यक्षपदी अनिल जगताप, सातारा जिल्हाध्यक्षपदी पल्लवी मसुरकर, सोलापूर जिल्हाध्यक्षपदी महादेव जंबगी, उपाध्यक्षपदी परमेश्वर आवताडे, ठाणे जिल्हाध्यक्षपदी भगवान विश्वकर्मा यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. उर्वरित जिल्ह्यामध्ये जिल्ह्यांच्या कार्यकारिणीची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
या बैठकीत लघु संवर्गाच्या वृत्तपत्रांना येणार्या अडचणींवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. या अडचणींच्या सोडवणुकीसाठी आगामी काळात देश आणि राज्य पातळीवर आंदोलन करण्याबाबत एकमत झाले. तसेच या प्रश्नांकडे आणि आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबतही ठराव संमत करण्यात आला.
या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव वाडकर, राष्ट्रीय सचिव ईश्वरसिंह सेंगर, राज्य अध्यक्ष संतोष धरमकर, राष्ट्रीय संघटक अनिल शिराळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रीय, राज्य, विभाग आणि जिल्हास्तरवर निवडण्यात आलेल्या नवपदाधिकारी आणि सदस्यांचे सत्कार करण्यात आले. बैठकीचे संयोजन आणि स्वागत संघटनेचे नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिलीप जोशी (परळी) यांनी केले, सुत्रसंचालन सोलापूर जिल्हाध्यक्ष महादेव जंबगी यांनी केले तर आभार प्रदर्शन भगवान परळीकर यांनी केले. सदर बैठकीस देशभरातून 50 हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती होती.