Home बीड मैत्रीनीच्या प्रीयकरावर तिची नजर फिरली अण , विपरितच घडले

मैत्रीनीच्या प्रीयकरावर तिची नजर फिरली अण , विपरितच घडले

920

 

अमिन शाह ,

त्रिकोणी प्रेमाची क्रूर कहानी

बीड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी महिलेच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत… तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिने केलेल्या कृत्याबद्दल पश्चातापाचा लवलेश देखील दिसून येणार नाही…माझ्या प्रियकरावर का प्रेम केलंस? म्हणून सख्ख्या मैत्रिणीचा तिने गळा दाबून खून केलाय.. सिनेमातल्या कथानकाला देखील मागे पाडेल अशी क्रूर घटना या आरोपी महिलेने केली.. बीडच्या अंबिका चौक परिसरात वृंदावनी फरताळे या आरोपी महिलेचे घर आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस दलात होमगार्ड पदावर असलेल्या आयोध्या व्हरकडे आणि वृंदावनी फरताळे या दोघींची मैत्री जमली.

ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट…

दोघेही तीन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंधात होत्या. याच काळात वृंदावनी हिचा प्रियकर घरी येत होता. त्याच दरम्यान त्याची ओळख होमगार्ड अयोध्या यांच्याशी झाली.. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट मैत्रिणीलाच आव्हान देण्यात आले…. मात्र मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करण्याने आपल्याला जीव गमावा लागेल याची पुसटशी कल्पना आयोध्याला नव्हती… आणि मग होत्याचे नव्हते झाले.. एका दिवशी आयोध्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली आणि माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही विवाह करणार आहोत.. असं म्हणत दोघींनी एकमेकांशी बाचाबाची झाली. याच दरम्यान आयोध्या यांनी विषारी औषध प्राशन केले आणि इथेच डाव फसला.. अयोध्या तडफडत असताना वृंदावनी हिने आधी तोंड दाबले नंतर तिची गळा दाबून निर्घृण हत्या केली.

तीन दिवसापासून फोन बंद

आयोध्या यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वीच अपघाती निधन झाले होते. त्यानंतर आयोध्या पोलीस दलातील होमगार्ड सेवेत रुजू झाल्या. त्यांना पोलीस दलात जायचं होते. त्यासाठी बीडमध्ये त्या सराव करत होत्या. मात्र तीन दिवसापासून त्यांचा फोन बंद आला. आणि नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केली. कुठेही आयोध्याचा संपर्क झाला नसल्याने नातेवाईकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोध्या मिसिंग असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. काल सायंकाळी आयोध्याच्या मृतदेचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र अद्याप त्याचा अहवाल आला नाही. त्यामुळेच पोलिसांनी तात्काळ अहवाल मिळवून घटनेची शहानिशा करून यात किती आरोपी आहेत? याचा उलघडा करावा अशी मागणी मयत होमगार्ड महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करणं एवढं महागात पडेल अस आयोध्याला कधीच वाटलं नव्हतं. प्रेमाच्या या गणिती काटकोन त्रिकोणातील प्रेमाचा अंत एवढा भयानक आणि भीषण होईल.. याचा स्वप्नात विचार देखील केला नाही आणि याच घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे.