Home बुलडाणा टोली युद्धातुन युवकाची चाकुने भोसकुन हत्या तीन आरोपीना अटक ,

टोली युद्धातुन युवकाची चाकुने भोसकुन हत्या तीन आरोपीना अटक ,

700

 

अमिन शाह

सैलानी बुलडाणा

जुन्या वादातून सैलानी येथे काल रात्रि थरारक खूनाची घटना घडली. इंदिरा नगर, बुलढाणा येथील रहिवासी व ऑटोचालक शेख नफिज शेख हाफिज (वय 38) याचा धारदार चाकूने वार करून खून करण्यात आला. ही घटना आज शनिवार, दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी उघड़किस आली सैलानी येथील बरीवाले बाबा दर्गाजवळील झोपडीसमोर घडली.
मृतकचा भाऊ फिर्यादी शेख हाशीम शेख हाफिज (वय 31, रा. इंदिरा नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मयत शेख नफिज हा अधूनमधून सैलानी येथे झोपडीत राहून अवैध धंदे करीत असे. काही दिवसांपूर्वी त्याचा आरोपी अॅलेक्स इनॉक जोसेफ उर्फ रोनी, शेख सलमान शेख अशपाक व सय्यद वाजीद सय्यद राजु उर्फ वाजीद टोपी यांच्यासोबत वाद झाला होता. याच रागातून आरोपींनी झोपडीसमोर बसलेल्या नफिजवर हल्ला केला. हल्ल्यात शेख सलमानने नफिज (उर्फ बाब्या) याचे केस पकडून धरले, वाजीदने लाकडी दांड्याने त्याच्या पायावर वार केला, तर अलेक्स उर्फ रोनीने हातातील धारदार चाकूने
सलग तीन ते चार वार छातीवर करून नफिजचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या नफिजचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते .
घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणी गुन्हा क्र.146/2025 भा.दं.सं. कलम 103(1), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. तपास सपोनी निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.पळून गेलेल्या तिन्ही आरोपिन्ना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रानी दिली आहे