Home महत्वाची बातमी जलसंधारणाच्या कामात उजाड गावावर पैशांचा पाऊस जोमात…!

जलसंधारणाच्या कामात उजाड गावावर पैशांचा पाऊस जोमात…!

25

यवतमाळ धिरज राठोड

दारव्हा दिग्रस नेर या तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मृदू व जलसंधारण विभागाच्या नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले असून सदर कामांमध्ये उजाड गावांवर करोडो रुपयाचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. 

नाला खोलीकरणाच्या नावावर सदर विभागाकडून करोडो रुपयांचा निधी खर्च होत असून दारव्हा दिग्रस नेर या तीनही तालुक्यातील कामे एकाच कंत्राट दाराला देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे सदर कंत्राटदाराने शासकीय नियम आणि मोजमा पुस्तिकेला फाटा देऊन मनमानी पद्धतीने काम करून शासनाचा निधी हडप करण्याचा प्रयत्न चालविला आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये नालाखोलीकरणाचे काम झालेले असून थातूरमातूर काम करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्या सोबत संगणमत करून मनमानी पद्धतीने नाला खोलीकरणाची कामे झालेली असून सदर कामाबाबत सर्वसामान्य जनतेला आणि नागरिकांना याबाबतली कुठलीही माहिती नसल्याने जनतेच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन कंत्राटदार आणि अधिकारी शासनाच्या करोडो रुपयांच्या निधीला चुना लावण्याचा गोरख धंदा चालविला असून तीन तालुक्यामधील 248 कोटी रुपयाचे काम एकाच कंत्राटदाराला देण्यात आल्याने मृद व जलसंधारण विभाग आणि जलसंधारण मंडळ या कंत्राटदारावर एवढे मेहरबान कसे असा प्रश्नही सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केल्या जात आहे उजाड गावी कोणाला माहित नसतात उजाड गावावर कोणाचे लक्ष नसते गैरप्रकार करण्यासाठी मात्र उजाड गावाच्या नावाचा वापर करून फार मोठे घबाड केल्या जात असल्याची चर्चा दारव्हा दिग्रस नेर या तीनही तालुक्यांमध्ये सुरू आहे कंत्राटदाराचे काम सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कधीही कामाकडे फिरकूनही पाहिले नसल्यामुळे सदर कंत्राटदाराची अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत संगणमत असल्याची शंका जन माणसात निर्माण होत आहे अलीकडच्या काळामध्ये दारव्हा तालुक्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत असून अनेक कामांमध्ये झालेला गैरप्रकार सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास येत असल्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय निधीत गैरप्रकार केल्या जातो याचा अंदाज मागील काही दिवसापासून तालुक्याची जनता घेत आहे एक कोटी रुपयाचे पूल पावसाच्या पहिल्याच पाण्यात वाहून गेल्याने दारव्हा तालुक्यामध्ये विकास कामांमधील कामाची गुणवत्ता जनतेच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मृद व जलसंधारण विभागाकडून करण्यात आलेल्या नाला खोलीकरण आणि सरळीकरण कामाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याची मागणी दारव्हा दिग्रस नेर या तीनही तालुक्यातील जनतेमधून केल्या जात आहे.