Home यवतमाळ घाटंजी येथे रविवारी भारतीय जनता पार्टीचे तालुका स्तरीय अधिवेशन…

घाटंजी येथे रविवारी भारतीय जनता पार्टीचे तालुका स्तरीय अधिवेशन…

15

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी, / यवतमाळ : 11 ऑगस्ट 2024 रोजी घाटंजी तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका स्तरीय अधिवेशन घाटंजी येथील सोनू मंगलम कार्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. या प्रसंगी आर्णी – केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे, यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे (वणी) आदीं उपस्थित राहणार आहे. या आधिवेशनात भारतीय जनता पार्टीचे तालुका पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे घाटंजी तालुका अध्यक्ष सुरेश डहाके, भाजपाचे घाटंजी शहर अध्यक्ष राम खांडरे यांनी केले आहे.