Home यवतमाळ पोलीस विभागातील चॉईस पोस्टिंग संदर्भात पोलीस महासंचालकनी दखल घेत दिला दम….!

पोलीस विभागातील चॉईस पोस्टिंग संदर्भात पोलीस महासंचालकनी दखल घेत दिला दम….!

42

मुंबई / यवतमाळ

सुशांत घाटे – राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि आणखी काही महत्वाच्या संदर्भात मागील सप्ताहात राज्याची पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी राज्यातील सर्व युनिट प्रमुखांना व्हिडिओ कॉन्फरेन्स मार्फत संबोधित केले असल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे डेली पोस्ट मार्टम नी काही दिवसा अगोदर यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस विभागातील “चॉईस पोस्टिंग साठी मोजले लाखो “या मथळ्या खाली वृत्त प्रकाशीत केले होते. यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंदे आणि चॉईस पोस्टिंग वर राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी यवतमाळ प्रकरणी चांगलेच यवतमाळ पोलीस अधीक्षकांना खडेबोल सुनवत राज्यातील सर्व युनिट प्रमुखांना पोस्टिंग *संदर्भात आर्थिक व्यवहार जर केला आणि त्याची तक्रार जर आली तर* याद राखा म्हणून चांगलाच दम पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी भरत कडक इशारा दिल्याचे विश्वसनीय सूत्रानी माहिती दिली आहे?

आर्थिक व्यवहार करून अपारदर्शक पद्धतीने मोठ्या प्रमाणात कथित भ्रष्टाचार साठी यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस खात्यात चांगलीच चर्चा रंगली असताना आता पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या दखली नंतर यवतमाळ पोलीस विभागात चांगलीच खळबळ माजली आहे. आतापर्यंत झालेले गुपित रहस्य याचे मागचे कीती घबाड याचाही शोध घेतल्या जातं असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. राज्याच्या सर्व पोलीस विभागातील युनिट प्रमुख उपस्थित असताना पोलीस महासंचालक यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पोस्टिंग मुद्धा उपस्थित करताच आणि कडक इशारा देताच चांगलीच धडकी पोलीस विभागातील युनिट प्रमुखांना लागली आहे. पारदर्शक, जिद्दी, चिकाटी ने काम करणाऱ्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी महाराष्ट्रा तील पोलीस विभागातील सर्व जिल्ह्यातील कामकाजावर करडी नजर ठेवली आहे.