अयनुद्दीन सोलंकी,
घाटंजी, / यवतमाळ – 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी लोकांच्या संस्कृती, परंपरा आणि हक्कांची मान्यता आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. 1994 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस प्रथम घोषित केला आणि त्यानंतर दरवर्षी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात. आदिवासी समुदायांच्या अधिकारांबाबत जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. सुरुवातीच्या काळात “जल – जंगल – जमीन” या करिता संघर्ष करत करत आपल्या “अन्न – वस्र – निवारा” या जुन्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नंतर काहीसा आदिवासी समाज स्थिरावलेला होता. वाढते तंत्र ज्ञान व शिक्षण सोयी नंतर या समाजातील अनेक तरुण, तरुणी तसेच आदिवासी बांधव “शिक्षण – आरोग्य – रोजगार” या नविन आधुनिक समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे करिता धडपडू लागले. मुलत: आदिवासी समाज हा स्वछंदी, आनंदी व नैसर्गिक जीवन शैलीत सुख मानणारा असतो. आज या समाजाच्या अनेक तरुण / तरुणी “मनोरंजन” या प्रगत समाजाची मूलभूत गरज पूर्ण व्हावी या करिता प्रयत्न करतात. परंतु आपले अंगभूत आनंदी पण विसरून आपण अस्थिर अशा जगाचे फायदे / तोटे समजून न घेता धडपणे हा मार्ग आपला नाही, असे आहे समजणे आवश्यक आहे. आपण आज समाजात, प्रशासनात व राजकारणात देखील चांगल्या पदावर वावरत आहोत. आपण जगात सर्वात श्रेष्ठ, विचाराने दैवत्व प्राप्त असलेला आदिवासी समाज मधील बांधव आहोत याचा अभिमान तर आहेच. मुळात सर्वव्यापी व सुसंकृत राहिलेला आदिवासी समजातून आपण आहात याचा आम्हाला अभिमान आहे. आज सर्व आदिवासी बांधवाना विश्व आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना, या संपूर्ण जगाचे तूम्ही मायबाप आहात… मालक आहात… व जे काही आहे ते आपल्याच मालकीचे आहे याच्या जाणीवपूर्वक आठवणी ठेवून समाजाचे नेतृत्व करत रहा… आपली सेवा देण्याची नैसर्गिक प्रवृत्ती हेच आपले धन!
जय सेवा!
➡️ विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक (VINOD CHAVHAN, POLICE INSPECTOR, GADCHIROLI), गडचिरोली