Home यवतमाळ अधर्मी, भुमाफिया, धर्माच्या ठेकेदारांचा पवित्र, पुरातन धर्मस्थळावर कब्जा – श्रीमती रूपालीताई गिरी

अधर्मी, भुमाफिया, धर्माच्या ठेकेदारांचा पवित्र, पुरातन धर्मस्थळावर कब्जा – श्रीमती रूपालीताई गिरी

160

भ्रष्ट प्रशासन आणि झोपलेली सरकार.

यवतमाळ (प्रतिनिधी) – शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भू माफिया व धार्मिक स्थळावरील अवैध कब्जा या विषयावर चांगलीच चर्चा रंगत असताना होणाऱ्या गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक प्रशासन दुर्लक्ष करीत असताना स्पष्ट दिरात आहे.

सविस्तर वृत्त असे की, यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीतील अतिशय पुरातन श्री केदारेश्वर महादेव मंदिर है भाविक भक्त्तांचे श्रद्धास्थान असून अतिशय महत्त्वाचे म्हणजे शहराच्या अगदी मध्यवस्तीत असल्यामुळे भक्तांना दर्शनासाठी लांब जाण्याधी गरज पडत नाही परंतु हे मध्यवस्तीत असल्यामुळे भूमाफीयांचा त्यावर डोळा असून स्वतःला धर्माचे ठेकेदार म्हणऊन घेणाऱ्या राजकीय पार्टीच्या मोठ्या पदाधिकाऱ्याच्या वरदहस्ताने पुरातन काळातील हेमडपंथी श्री केदारेश्वर महादेव मंदिरासारख्या पवित्र स्थळांवर अवैधपणे कब्जा केल्या जात असून आठ पिढ्‌यांपासून श्रद्धेने अविरत महादेवाची सेवा करणाऱ्या पुजाऱ्याच्या कुटुंबाला धमकावल्या जात आहे. एवढ्‌यावरच ते थांबलेले नसून पुजारी रूपाताई प्रमोद गिरी हिचेवर चक्क बंदूक रोखल्या गेली. याबाबत प्रशासनाकडे रीतसर तक्रार करून सुद्धा पवित्र धार्मिक स्थळावर असे कृत्य करणाऱ्यावर कोणतीही कारवाई केल्या जात नसून याउलट राजेश राव सारख्या गुंडाला पाठीशी घालून अडसर ठरत असलेल्या अन्यायग्रस्त कुटुंबाला मंदिर परिसरातून हाकलण्यासाठी राजेश राव याचा वापर केला जात आहे.

पुरातन वास्तू नष्ट करणे, मनमानी कारभार, पूजनीय झाडांची कत्तल, मंदिरात मिळणाऱ्या दान रुपयांमध्ये अनेक गडबडी, असे अनेक गैरप्रकार तिथे चालू असल्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाला पुराव्यानिशी रीतसर तक्रारी दिलेल्या आहेत परंतु प्रशासनकडून कुठलीही ठोस कारवाई आतापर्यंत केल्या गेलेली नाही.

यवतमाळ मध्ये भूमाफियांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे त्यावर त्यांची मजल धार्मिक स्थळांवर सुद्धा पोहोचलेली आहे. या भूमाफियांना राजकीय पाठवळ मिळाल्यामुळे कुठलीही कारवाईची भीती उरलेली नाही. परंतु हे कारण यवतमाळ मध्ये धार्मिक दंगल घडण्यास कारणीभूत ठरू शकते त्यामुळे प्रशासनाने याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे.