Home जळगाव प्रकाश दायी एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी तर्फे 33 पुरस्कारार्थीना मौलाना आझाद लोक...

प्रकाश दायी एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी तर्फे 33 पुरस्कारार्थीना मौलाना आझाद लोक मित्र पुरस्काराने सन्मानित

223

शरीफ शेख

जळगाव , दि. ०५ :- जिल्ह्यातील कासोदा तालुका एरंडोल येथे प्रकाश दायी एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी मालेगाव शाखा कासोदा च्या वतीने सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महाराष्ट्रातील 33 पुरस्कारार्थी ना मौलाना आझाद लोकमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार होते प्रमुख पाहुणे म्हणून पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाकिजा पटेल जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील ,विवेक ठाकरे ,किशोर पाटील ,कुणझर कर, प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव, फारुख शहा नोमानी ,हाजी तय्यब अली ,सलाउद्दीन अलाउद्दीन शेख, अफसर अली हैदर अली, संदीप वाघ ,आनंदा हरी मिस्त्री, अब्दुल सत्तार पटेल ,आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी करण बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले की प्रकाश दायी संस्था खरोखरच प्रकाश देण्याचे काम करीत आहे या पुरस्काराने पुरस्कार थिनां काम करण्याचे बळ मिळेल व दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल या संस्थेचे काम गौरव पथ असल्याचे सांगितले तर अध्यक्षीय भाषणात अब्दुल करीम सालार यांनी सांगितले की संस्थेचे अध्यक्ष मोइन शेख व संयोजक नूरुद्दीन मुल्लाजी व त्यांच्या संस्थाने मानवतेचे काम केले असून अनेक क्षेत्रातील लोकांना त्यांनी गौरवान्वित केले आहे मौलाना आझाद यांचे प्रेरणादायी काम डोळ्यासमोर ठेवून पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्ती काम करण्याचे आव्हान केले सूत्रसंचालन संयोजक नूरुद्दीन मुल्लाजी तर आभार आरिफ पेंटर यांनी मानले कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते पुरस्कार तीन ते नाव पुढील प्रमाणे डॉक्टर प्राध्यापक विजय मृत्युंजय शास्त्री, प्राध्यापक प्रतापराव पवार पटेल ,बबीता उस्मान पटेल, ईश्वर रामदास पाटील, सचिन विठ्ठल राव राऊत ,सुनीलन न्हानू दाभाडे, सौ अर्चना पंजाबराव पाटील ,शेख जावेद शेख याकु, ब फिरोज रफिक शेख ,प्रतिभा विनोद कुमावत, अनिल राजेंद्र गजरे ,उमेश श्रीराम पाटील, डॉक्टर शेख अहमद पटेल ,नर्गिस अब्दुल खान ,सागर काशिनाथ रणधीर ,खाटीक आसिफ गुलाब ,चेतन एकनाथ राजपूत, सौ सुनंदा उत्तम महाजन ,मुस्ताक अहमद मोहम्मद इक्बाल सालार, जितेंद्र केवलसिंग पाटील ,सौ छाया शिवाजीराव सोनवणे ,अशफाक कबीर उद्दीन शेख, ऐनुद्दीन सर धरणगाव, शेख सलमान शेख शब्बीर ,भगतसिंग शालीग्राम पाटील ,शेखर रतनाकर बुंदेले ,प्राध्यापक समीर विष्णू घोडेस्वार ,प्रशांत राज सुपडु तायडे, मुफती सय्यद अरशद अली, जियाउद्दिन गयासुद्दीन काझी ,मोहम्मद उस्मान शेख अब्बास, श्रीमती अनिता दशरथ मोरे ,शांताराम बळीराम कोळी, यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.